Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath Shinde Sarkarnama
विशेष

सुप्रीम कोर्टातील सीमाप्रश्नाच्या लढाईची जबाबदारी शिंदे सरकारने सोपवली ‘या’ ज्येष्ठ वकिलावर!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच दुप्पट निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय सीमावर्ती भागातील नागरिकांवर होणार अन्याय दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) लवकरच भेट घेणार आहोत, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. (Border issue, Maharashtra government Adv. Vaidyanathan was appointed to the Supreme Court)

बेळगावसह सीमाप्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी मंत्रालयात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सीमाप्रश्नाचा लढा पुढे नेण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सीमावर्ती भागाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या लढ्याला बळकटी मिळावी, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह सर्वच प्रमुख योजनांचा लाभ बेळगावसहित सीमावर्ती भागातील नागरिकांना देण्याचा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे यावेळी करण्यात आली. सीमावर्ती भागाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या लढ्याला बळकटी मिळावी, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली.

सीमाप्रश्नावर वेळोवेळी होणाऱ्या सुनावणीबाबत समन्वय साधण्यासाठी मंत्रिमंडळातील सहयोगी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनाही स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच दुप्पट निवृत्ती वेतन देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. मी आणि देवेंद्र फडणवीस लवकरच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांची भेट घेऊन सीमाभागातील नागरिकांवर होणारा अन्याय रोखण्याची विनंती करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून सीमावर्ती भागातील प्रत्येक बांधवाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना दिली. या वेळी समितीचे सदस्य मंत्री शंभूराज देसाई, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री डॉ. तानाजी सावंत, मंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, दिनेश ओऊळकर, विनोद आंबेवाडकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT