Eknath Shinde Sarkarnama
विशेष

चहा पिण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गाड्यांचा ताफा थांबवला रस्त्यालगतच्या हॉटेलवर!

विशेष म्हणजे शिंदेंनी यापूर्वीही अशाच प्रकारे चहा घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या या साधेपणाने गावकरीही भारावून गेले होते.

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख, माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मोटारीने औरंगाबादकडे येत होते. त्यावेळी चहा पिण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा अचानक महामार्गालगतच्या एका हॉटेलसमोर थांबवला. या वेळी त्यांच्यासोबत रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट हेही होते. विशेष म्हणजे शिंदेंनी यापूर्वीही अशाच प्रकारे चहा घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या या साधेपणाने गावकरीही भारावून गेले होते, तसेच सोशल मीडियातही याची चर्चा रंगली आहे. (Chief Minister shinde stopped the fleet to drink tea at hotel next to the road)

माजी आमदार मेटे यांचे रविवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघाती निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी लावली.

मुख्यमंत्री शिंदे हे अंत्यसंस्कार झाल्यानंतर मोटारीने औरंगाबादकडे परत येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत रोहयो मंत्री भूमरेही होते. मुख्यमंत्र्यांनी चहा पिण्यासाठी अचानक आपला ताफा महामार्गालगतच्या हॉटेलसमोर थांबवला. मुख्यमंत्री थांबल्याचे समजताच गावकऱ्यांनीही हॉटेलमध्ये गर्दी केली हेाती. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले सहकारी भुमरे यांच्यासह इतरांबरोबर त्या हॉटेलमध्ये चहाचा आस्वाद घेतला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी अनेकदा रस्त्यालगत थांबून चहा घेतल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक थांबल्याने नेमकं काय झालं आहे, सुरुवातीला कुणालाच कळेना. मात्र, शिंदे यांनी चहा-नाश्त्यासाठी ताफा थांबवल्याचे काही क्षणातच स्पष्ट झाले. ही गोष्ट परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनीही हॉटेलजवळ मोठी गर्दी केली होती. अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे चहा पितानाचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. ते व्हिडिओ सोशल मीडियात जोरात फिरत आहेत.

मुख्यमंत्री यापूर्वी औरंगाबादला आले असताना सिल्लोड येथून येत असताना फुलंब्रीत अशा प्रकारे चहा पिण्यासाठी ताफा थांबवला होता. त्यावेळीही त्यांनी रस्त्यालगतच एका हॉटेलमध्ये चहा घेतला होता. शिंदे यांच्या या साधेपणाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT