Congress News Sarkarnama
विशेष

Maharashtra Congress march : काँग्रेसची १६ ऑगस्टनंतर राज्यात पदयात्रा; या नेत्यांवर असणार महत्वपूर्ण जबाबदारी

Congress News : ही मोहीम राज्यातील सहा विभागांत राबवली जाणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून महाराष्ट्र काँग्रेसनेही राज्यात पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १६ ऑगस्टनंतर राज्यातील सहा विभागात ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेची जबाबदारी विभागनिहाय नेत्यांवर देण्यात आलेली आहे. (Congress march in the state after August 16)

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढविण्याची मुभा आहे, त्यानुसार आम्ही पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १६ ऑगस्टनंतर पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही मोहीम राज्यातील (Maharashtra) सहा विभागांत राबवली जाणार आहे. ता. १६ ऑगस्ट रोजी सुरू होणारी पदयात्रा ३१ ऑगस्टला संपणार आहे.

विभागानुसार प्रत्येक नेत्यांवर या पदयात्रेची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यात काँग्रेसचे प्रभारी नाना पटोले यांच्यावर पूर्व विदर्भाची, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे पश्चिम विदर्भाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या पदयात्रेचे नेतृत्व करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात ही पदयात्रा निघणार आहे. विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात हे उत्तर महाराष्ट्रात जबाबदारी सांभाळणार आहेत. मुंबईत माजी मंत्री वर्षा गायकवाड ह्या या पदयात्रेचे नेतृत्व करतील. कोकणात मात्र काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते मैदानात उतरणार आहेत.

ही पदयात्रा बसमधून केली जाणार आहे. त्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या कामांची पोलखोल केली जाणार आहे. प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, त्यानुसार आम्ही ही पदयात्रा काढत आहोत. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा असेल, ते केली जाईल, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

लोकसभेचे प्रभारी १५ ऑगस्टला अहवाल देतील

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात प्रभारी नेमले आहेत. ते त्या त्या लोकसभा संघात दोन दिवस राहून परिस्थिती काय, हा अहवाल देतील. हे लोकसभेचे प्रभारी १५ ऑगस्टला अहवाल देतील. त्यावर १६ ऑगस्ट रोजी बैठक होईल, त्यात मतदारसंघाबाबत चर्चा होईल, असेही पटोले यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT