Ranjit singh Naik Nimbalkar  Sarkarnama
विशेष

Congress MLA Will Split? : काँग्रेस आमदार अस्वस्थ, महाआघाडीतून फुटून भाजपत प्रवेश करणार; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

भारत नागणे

Pandharpur News : भारतीय जनता पक्षाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज (ता. २९ जुलै) एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. लवकरच काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडीतून फुटतील आणि ते भाजपत सामील होतील, असा खळबजनक गौप्यस्फोट खासदार निंबाळकर यांनी केला आहे. (Congress MLA will break away from Mahavikas Aghadi and join BJP : Ranjitsinh Naik Nimbalkar)

खासदार निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी आज पंढरपुरात (Pandharpur) माध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदारांबाबत गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, अजित पवार आणि त्यांच्यासोबत ३५ ते ४० आमदारांनी साथ सोडल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यात काँग्रेसच्या (Congress)आमदारांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे काँग्रेसचे हे आमदार लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील. महाविकास आघाडीतून फुटल्यानंतर ते आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही निंबाळकर यांनी केला.

महाविकास आघाडीचे नेतृत्व सध्या काँग्रेस करत आहे. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलो तर आपले नुकसान होईल, अशी शंका या आमदारांना आहे. त्यामुळेच हे काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपमध्ये सहभागी हेातील, असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

सर्वच पक्षाच्या आमदारांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी दिला आहे. त्या निधीतून कोणताही आमदार आपली स्वतःची कामे करत नाही. पण, आमदार रोहित पवार यांचा निधी वाटपच्या विषयाचा अभ्यास थोडा कच्चा असावा, असा टोलाही निंबाळकर यांनी लगावला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे, सोलापर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे, उत्तम जानकर, भाजपचे पांडुरंग वाघमोडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT