Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
विशेष

एकनाथ शिंदेंचा तो व्हिडिओ काॅंग्रेसने शेअर केलाय...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा एक व्हिडिओ (video) महाराष्ट्र काँग्रेसने (Congress) व्हायरल केला आहे. त्याला ‘असा हा भाजपचा पाहुणचार; बंडखोरांची हरपली शुद्ध पार’ अशी टॅगलाईन दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात फिरत आहे. नेटकऱ्यांकडून एकनाथ शिंदे यांचा ‘कडक’ शब्दांत समाचार घेण्यात आलेला आहे. (Congress shares Eknath Shinde's video)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून प्रथम सूरत गाठली. त्या ठिकाणी एक दिवस मुक्काम केल्यानंतर शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आसामधील गुवाहाटीमध्ये जाणे पसंत केले. सूरतहून गुवाहाटीमध्ये गेल्यानंतरचा काँग्रेसने व्हायरल केलेला एकनाथ शिंदे यांचा तो व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. त्या व्हिडिओमध्ये शिंदे हे मोठ्या गर्दीत अडकल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर पत्रकारांकडून विविध प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. मात्र, शिंदे यांना या गर्दीत नीट बोलता येत नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तोच व्हिडिओ महाराष्ट्र काँग्रेसने व्हायरल केला आहे.

प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यामध्ये एक नेटकऱ्याने म्हटले आहे की, ‘अरेरे.... काय अवस्था झाली आहे.’ काही जुने संदर्भ देत एकनाथ शिंदे यांना वेळीच सावध होण्याचा सल्ला एका नेटकऱ्याने दिला आहे. ‘वाघ डुलतोय आणि मी पाहिलंय’ अशी एक मजेशीर कमेंटही या व्हिडिओवर करण्यात आलेली आहे. ती शिवसेनेचे चिन्ह असलेल्या वाघाचा संदर्भ देऊन करण्यात आलेली आहे. ‘कब तक रहोंगे गुवाहटीमें; कबी तो आवोगे चौपाटीमें’ अशी प्रतिक्रिया एकाने नोंदविली आहे.

काही नेटकऱ्यांनी शिंदे यांच्या बाजूनेही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘ह्यात असं काहीही दिसतं नाही..उगाच कुणाची बदनामी करु नये,’ असा सल्लाही काँग्रेस पक्षाला दिला आहे. काही कमेंट ह्या आक्षेपार्ह आहेत, त्यामुळे आम्ही या ठिकाणी देऊ शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT