Uddhav Thackeray News Sarkarnama
विशेष

Uddhav Thackeray News : ठाकरेंचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपला; पुढे काय? घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले

Shivsena News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली.

सरकारनामा ब्यूरो

Shivsena Symbol Crisis News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. खरी शिवसेना कुणाची यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात केंद्रीय निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे. त्यातच ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारी रोजी संपुष्टात आला. त्या संदर्भात घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

शिवसेनेचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगापुढे (Central Election Commission) सुरू आहे. शिवसेनेत अंतर्गत निवडणुका घेऊन पक्षप्रमुखाची निवड करण्यासंदर्भात ठाकरे गटाने आयोगाला पत्र दिले आहे. मात्र, आयोगाने त्यावर अजून कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपल्याकडे बहुमत असल्याने आपणच शिवसेनेचे नेते आहोत, असा दावा शिंदे यांनी केला आहे. आज 30 जानेवारीरोजी या महत्त्वाच्या मुद्द्यावरही केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) घटनेत पक्षप्रमुख पदाला विशेष अधिकार आहेत. पक्षप्रमुखच कोणालाही पदावरून हटवू शकतो. जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या नियुक्त्या करु शकतो. मात्र, आता ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळच संपुष्टात आल्याने नियुक्त्या कशा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर बापट यांनी आपले मत मांडले आहे.

बापट म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारी रोजी संपुष्टात आला हे बरोबर आहे. तरी नियमानुसार दुसऱ्या पक्षप्रमुखाची निवड होत नाही, तोपर्यंत पहिल्या पक्षप्रमुखाचे अधिकार कायम असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षप्रमुख पदाची निवड होईपर्यंत शिवसेनेत उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख राहणार आहेत.

पक्षप्रमुखाला असतात, तसे सर्व अधिकार उद्धव ठाकरे घटनात्मक रित्या वापरू शकतील. त्यामुळे ठाकरे यांना कोणतीही अडचण नाही. ठाकरे विधानपरिषद, विधानसभेवरील नियुक्त्या, पक्षाच्या विविध पदांवरील नियुक्ता करु शकतील. कायदेशीर दृष्ट्या कोणतीही अडचण येणार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT