Deepali Sayed News
Deepali Sayed News Sarkarnama
विशेष

Deepali Sayed News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फसवले का? दीपाली सय्यद यांनी स्पष्टच सांगितले

सरकारनामा ब्यूरो

Deepali Sayed News : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांचा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) प्रवेश अजुनही झालेला नाही. त्यावरु राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु आहे. या बद्दल दीपाली सय्यद यांनी स्पष्ट भाष्य केले.

दीपाली सय्यद 'सरकारनामा ओपन माईक सिजन - 2' कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. या कार्यक्रमाला भाजपचे (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या दिपाली सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये तीन राऊंड होते, पहिल्या राऊंड होता, 'काढा डिटेक्टर' यामध्ये नेत्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. दुसरा राऊंड होता 'ईडी' म्हणजेच 'इकडचा डॉन', या राऊंडमध्ये नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारायचे होते. तीसरा राऊंड 'करेक्ट कार्यक्रम' होता. यामध्ये उपस्थितांना काही कार्ड देण्यात आले होते. त्यामध्ये एक कार्ड त्यांनी निवडायचे होते. त्यावर फोटो असलेल्या नेत्याला ट्रोल करायचे होते.

या कार्यक्रमात दीपाली सय्यद यांना प्रश्न विचारण्यात आला होता. शिंदे साहेबांनी फसवले असे वाटते का? त्यांवर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले. त्या म्हणाल्या, मला शिंदे साहिबांनी शिवसेनेत आणले होते. माझ्यासाठी आमदारकी लढवणे मोठी गोष्ट होती. फसवण्यासारखे काहीच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे झाले त्यानंतर नवे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. महाविकास आघाडी एकत्र आली तेव्हा माझ्या मनात प्रश्न होता. मात्र, आता शिंदे यांच्यासोबत जाणार आहे.

मला शिंदे साहेबांनी सांगितले आहे, त्यामुळे प्रवेश निश्चित होईल, असेही त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी दीपाली सय्यद यांना प्रश्न विचारला होता. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उभे राहणार का? त्यावर दीपाली सय्यद यांनी सांगितले की शिंदे साहेब यांनी आव्हाडांच्या विरोधात लढा असे सांगितेल तर पुन्हा निवडणूक लढणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात नेत्यांनी एकमेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. तसेच अडचणीचे प्रश्न विचारुन कोंडीही केली आणि हास्यविनोद करत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली. तसेच एकमेकांना चांगलेच चिमटेही काढले. राजकारणाच्या पलिकडे जाऊन नेते या कार्यक्रमात रंगून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT