Ravindra Dhangekar Sarkarnama
विशेष

Kasba By Election Result: धंगेकरांनी ‘महाशक्ती’ला दाखवला ‘कात्रजचा घाट’: भाजपचा बालेकिल्ला २८ वर्षांनंतर उद्‌ध्वस्त

Ravindra Dhangekar Won: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात उतरले होते.

Vijaykumar Dudhale

Pune By Election Result: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात उतरले. मात्र, सर्वसामान्यांशी कनेक्ट असणारे काँग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवित ‘महाशक्ती’ला कात्रजचा घाट दाखवला आहे. धंगेकर यांनी भाजपचा बालेकिल्ला तब्बल २८ वर्षांनंतर उद्‌ध्वस्त केला आहे. (Defeat of BJP after 28 years in Kasba)

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक लागली हेाती. त्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांना, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली हेाती. दोन्ही बाजूकडून अखेरपर्यंत जोरदार शह कटशहाचे राजकारण खेळले गेले. धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच ही जागा भाजपासाठी अवघड आहे, असे विश्लेषण होत होते. त्यातूनच भाजपनेही टिळक कुटुंबाऐवजी रासने यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली हेाती. मात्र, धंगेकर यांच्या लोकप्रियतेपुढे तेही टिकाव धरू शकले नाहीत.

रासने यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी शक्ती पणाला लावली होती. त्यासाठी त्यांनी स्वतः मतदारसंघात तळ ठोकला होता. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शेवटच्या टप्प्यात पुण्यात प्रचारासाठी हजेरी लावली होती. त्याच काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रासने यांना घेऊन त्याच मतदारसंघातील मंदिराला भेट दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी हजेरी लावूनही धंगेकर यांनी आपल्या कार्यक्षमतेवर ही निवडणूक जिंकली.

ग्राऊंडवर असणारे काम धंगेकर यांच्या विजयातील सर्वांत मोठं वैशिष्ट्य ठरलं आहे. त्यांना कसब्यात आपला माणूस आणि कामाचा माणूस म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या प्रचारात सर्वपक्षीय कार्यकर्ते उतरले होते. सर्वसामान्यांशी असणारा कनेक्टचा धंगेकर यांच्या विजयातील की फॅक्टर ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT