Congress Sarkarnama
विशेष

Maharashtra Congress News : काँग्रेसही भाकरी फिरवणार? अनेक निवडणुकांमध्ये किंगमेकर ठरलेले 'हे' दोन नेते प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत

Nana Patole News : यामुळे काँग्रेसला राज्यात नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

Congress News : राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसफूस सुरु आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात एका गटाची नाराजी वाढली आहे. यामुळे काँग्रेसला राज्यात नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रामध्ये अगामी काही दिवसांमध्ये अनेक निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थासह, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच पटोले यांना पक्षांतर्गत विरोध वाढल्याचे सांगितेल जात आहे. विशेष करुन विधान परिषद निवडणुकीत आमदार सत्यजीत तांबे यांच्या तिकिटाच्या वेळी मोठे नाट्य रंगले होते. तेव्हापासून काँग्रेसमध्ये सगळे काही अलबेल नसल्याची चर्चा आहे.

काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे पटोले यांची तक्रार केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता विदर्भातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर (Vijay Vadettivar), सुनील केदार (Sunil Kedar) व ज्येष्ट नेते शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) यांनी पटोलेंना पदावरुन दूर करण्यासाठी दिल्लीत तळ ठोकल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरुन गच्छंती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पटोले यांच्या कार्यशैलीमुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पटोले यांच्या जागी सर्वांना मान्य असेल आणि आगामी निवडुकांच्या दृष्टीने सर्व नेत्यांना एकत्र जोडून ठेवू शकेल, असे नेतृत्व महाराष्ट काँग्रेसला देण्यासाठई पक्षाकडून हालचाली सुरु असल्यांचे बोलले जात आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मंत्री सतेज पाटील, सुनिल केदार, यशोमती ठाकूर यांच्या नावाच समावेश आहे. मात्र या स्पर्धेत सध्या तरी सुनिल केदार आणि सतेज पाटील हे आघाडीवर आहेत. केदार विदर्भातील काँग्रेसचा मोठ चेहरा आहे. तसचे त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला आहे. नागपूर जिल्हा परिषदेची सत्ता भाजपकडून पुन्हा मिळवली होती. बाजार समित्यांमध्ये काँग्रेसने चांगले प्रदर्शन केले होते. तसेच विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सतेज पाटील पश्चिम महाराष्ट्रातील मुत्सद्दी नेते म्हणून पाहिले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दहापैकी चार आमदार निवडून आणले होते. तसेच पुणे शिक्षक मतदार संघातून प्रा. जयंत आसगावकरांच्या विजयाने त्यांच्या मुत्सद्देगिरीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे पाडले जड आहे. त्यातच यशोमती ठकूर यांनीही अमरावतीमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळे तरुन चेहऱ्यांना काँग्रेसने संधी दिल्यास या नावांचा विचार होऊ शकतो.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT