Shivajirao Adhalrao Patil -Dilip Walse Patil  Sarkarnama
विशेष

वळसे पाटील अन्‌ माझे वय झाले, याचा अर्थ आम्ही रिटायर्ड होणार असे नाही : आढळरावांची तुफान बॅटिंग

मी आता खासदार नाही आणि आमदारही नाही.

डी. के. वळसे पाटील

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी येथे रविवारी (ता. ६ नोव्हेंबर) विविध कार्यकारी सोसायटी शताब्दी महोत्सव कार्यक्रमात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) व बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) प्रथमच एकत्र आले. दोन्ही नेते एकमेकांशी मनमुराद गप्पा मारत होते. ‘सर्व गोष्टींत राजकारण करायचे नसते. वळसे पाटील व माझे वय झाले आहे. टीका करायचे वय निघून गेले आहे. मात्र याचा अर्थ आम्ही रिटायर्ड होणार, असा अर्थ अजिबात कोणी काढू नये. एकमेकांच्या सहकार्यातून विकासाचे प्रकल्प मार्गी लावू,” अशी ग्वाही आढळराव पाटील यांनी दिली. (Former Home Minister Dilip Walse Patil and former MP Shivajirao Adhalrao Patil came together)

शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध शिवसेना बाळासाहेब गट, भाजप व सर्व विरोधक असे एकत्रित पॅनेल आहे. नुकत्याच तेथील झालेल्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्या आरोपांच्या तोफा धडाडल्या होत्या.

दरम्यान, गावडेवाडी येथे वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भीमाशंकरचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील यांचा सन्मान आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्या पूर्वीच्या मैत्रीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे हे आढळराव पाटील ऊर्फ दादा यांच्याकडे कटाक्ष टाकत म्हणाले “दादा तुमचे आत्ता आमच्याकडे लक्ष राहिले नाही.” गावडे यांच्या वक्तव्याचा धागा पकडून आढळराव पाटील यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे नाव न घेता सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले “मी आता खासदार नाही आणि आमदारही नाही.’ लक्ष देणारे दुसरे कोणीतरी आहे. त्यांना तुम्ही विचारले पाहिजे. पण ठीक आहे. हरकत नाही मी लक्ष देत आहे.” यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT