Amruta Fadnavis
Amruta Fadnavis  Sarkarnama
विशेष

मी खरं बोलते म्हणून विरोधक ट्रोलिंग करतात.. पण मुद्यांवर कधी बोलणार?

विष्णू सानप

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे फक्त वसुलीवर लक्ष असून बाकी कश्यावरच लक्ष नाही, असा घणाघात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला.

अमृता फडणवीस यांनी 'सरकारनामाला' खास मुलाखत दिली. त्यांनी विविध विषयांवर मते व्यक्त केली. राजकीय मते, गायनाचा छंद, मुलगी दिविजा हिचे संगोपन, नोकरी याबद्दल त्यांनी मोकळेपणाने मते मांडली.

त्या म्हणाल्या,``माझ्यावर राजकीय स्टॅम्प आहे. यामुळे माझ्या वक्तव्याला ट्रोल केले जाते. माझ्या मांडलेल्या विचारांना, टीकेला सामान्य महिलेप्रमाणेच बघायला हवे. पुरोगामी महाराष्ट्रात प्रत्येक महिलेला तिचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. यामुळे माझ्या विचारलेल्या प्रश्नाला ट्रोल करून बगल न देता त्यास उत्तर दिले पाहिजे.

"मी खर आहे ते बोलते आणि जनतेलाही जे खरे वाटते तेच मी बोलते. यामुळे विरोधकांना मिरची लागणे स्वाभाविक आहे. मात्र, याकडे त्यांनी सामान्य स्त्री पाहावे. त्यास राजकीय अँगल देऊन बघू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मी काही मत व्यक्त केले की माझे राहणीमान, गायन अशा व्यक्तिगत गोष्टीवर टीका केली जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याबद्दल त्या म्हणाल्या की या सरकारचा वचक कशावरच नाही. स्त्री-अत्याचारा संदर्भात तरी, लवकर ऍक्शन घ्यावी. स्त्रियांवर याआधी सुद्धा यापेक्षा जास्त अत्याचार होत होते. मात्र, त्यावेळी स्त्रिया बोलत नव्हत्या. मात्र, आता 'मी टू' चळवळच्या माध्यमातून किंवा स्त्रिया बोलत असल्याने हे प्रकरणे पुढे येत आहेत. आता हे कृत्य करणाऱ्या नाराधमांवर वचक निर्माण करण्याची गरज आहे.

याबरोबरच कुटुंबात मुलांना स्त्रियांबद्दल आदर ठेवावा ही शिकवण देणे गरजेचे असून शालेय अभ्यासक्रमात ठळकपणे ह्या गोष्टी असायला हव्या. तसेच, नुसते कडक कायदे करून फायदा नसून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT