Imtiaz Jaleel on Sarkarnama Open Mic Sarkarnama
विशेष

Sarkarnama open mic : खासदार जलील यांना कठीण प्रश्न आणि त्यांची चपखल उत्तरे

Sarkarnama open mic मध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी उडविली धमाल..

Yogesh Kute

पुणे : राज्यातील तरुण नेत्यांच्या मनातील महाराष्ट्र काय आहे, पत्रकारांच्या भूमिकेतून नेत्यांनीच नेत्यांना विचारलेले तिखट प्रश्न अन् त्याला मिळालेले हजरजबाबी उत्तर, राजकारणापलीकडे जाऊन रंगलेला हा 'सामना' नुकताच सकाळ डिजिटलतर्फे घेण्यात आलेल्या 'Sarkarnama Open Mic Challenge'या कार्यक्रमात पाहायला मिळाला.

उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel), काँग्रेसचे आमदार धीरज (Dhiraj Deshmukh) देशमुख व भाजपचे आमदार परिणय फुके (Parinay Fuke) उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 'सरकारनामा हिट वेव्ह'मध्ये नेत्यांनी एकमेकांना प्रश्न विचारायचे होते. जलील यांना या चारही नेत्यांनी प्रश्न विचारले. त्यांनी चलाखपणे त्यास उत्तर दिली. आदिती ठाकरे यांनी इ्म्तियाज जलील यांना प्रश्न विचारला की 'हिंदुस्थान की इंडिया'. त्यावर जलील म्हणाले, इंडिया, भारत, हिंदुस्थान हे तिघेही चालतील," एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी इम्तियाज जलील यांना 'बी टीम की सी टीम', असा प्रश्न विचारला. यावर एमआयएमची सध्याची परिस्थिती कशी आहे, याबाबत इम्तियाज यांनी एका चित्रपटाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "मागे एक चित्रपट आला होता. 'पती-पत्नी और वो'यातील 'वो'आम्ही आहोत. अनेक जण म्हणतात, तुम्ही आमचेच. पण आम्हाला कळत नाही काय करायचे, अशी परिस्थिती आमची झाली आहे,"

गुजरात जिंकायला नाही पाहिजे...

काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी आयपीएलचा उल्लेख करीत इम्तियाज जलील यांना प्रश्न विचारला. "गुजरात आणि लखनौ या दोन टीम सध्या आयपीएलमध्ये उतरल्या आहेत. तुम्हाला कोणत्या टीममध्ये खेळायला आवडेल," असा प्रश्न धीरज देशमुख यांनी केला. "मी किक्रेट खेळणार की नाही, पाहणार की नाही, यापेक्षाही मला असं वाटलं की या सामन्यात गुजरात जिंकायला नाही पाहिजे, हे मी 'मनसे' नव्हे तर 'दिलसे' बोलत आहे.

आघाडी सरकाला एक चाक लावण्याची गरज..

महाविकास आघाडीशी युती करायला एमआयएमचा प्रस्ताव आहे, त्याचे काय झाले या फुके यांच्या प्रश्नावर जलील म्हणाले की "मी यांना (शिंदे यांच्याकडे पाहत) प्रस्ताव दिलेला नाही. पण काॅंग्रेस व राष्ट्रवादीला दिला आहे. देशात भाजपचा पराभव करण्यासाठी तीन चाकीला एक चाक लावण्याची गरज आहे. मी त्यांच्यामागे यासाठी पाठपुरावा करणार आहे.

या कार्यक्रमासाठी व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश आसबे, आयकॉन 51 प्रकल्पाचे सचिन तोष्णीवाल, महावीर चोरडिया सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया, हॉटेल 24 के क्राफ्ट ब्रिझचे राजेश करंदिकर यांनी प्रायोजिकत्व दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT