पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (pdcc bank election) भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप कंद (pradip kand) यांच्या विजयासाठी बारामती, इंदापूर, आंबेगावसह तीन मंत्री आणि सत्तापक्षाच्या चार आमदारांच्या तालुक्यांनीच मोठा हातभार लावला आहे. प्रदीप कंद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाच्या कामगिरीचाही मोठा फायदा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत झाल्याची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगू लागली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यांसह भोरचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते, शिरूरचे आमदार अशोक पवार आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या तालुक्यांनी कंद यांना भरभरून मतदान केल्याचे मतमोजणीत पुढे आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, प्रदीप कंद यांना त्यांचा स्वतालुका असलेल्या हवेली तालुक्यातील तुलनेने फारसे पाठबळ मिळाले नसल्याचे दिसून आले आहे. कंद यांना आंबेगाव, भोर, इंदापूर, जुन्नर, खेड, मुळशी आणि शिरूर यापैकी भोरचा अपवाद वगळता राष्ट्रवादी कॉग्रेसचे वर्चस्व असलेल्या या सहा तालुक्यांत राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. शिवाय बारामती तालुक्यातून ५२ मते त्यांना मिळाली आहेत. मावळ तालुक्यात प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार घुले यांना समान मते मिळाली आहेत. हीच मते कंद यांना विजयाच्या मार्गाकडे नेण्यास कारणीभूत ठरली आहेत.
प्रदीप कंद मिळालेली तालुकानिहाय मते (कंसात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली मते) : आंबेगाव-२४ (१४), इंदापूर- २७ (१६), जुन्नर-६७ (२४), खेड-२२ (१२), मुळशी-१० (८), शिरूर- १६ (१५), भोर- १५(१०). हवेली तालुक्यातून कंद यांना ११८ तर सुरेश घुले यांना १३१ मते मिळाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.