Sharad Pawar News Sarkarnama
विशेष

Sakal-Saam TV Survey : पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा का? सकाळ-सामच्या सर्व्हेमध्ये समर्थक म्हणतात...

Sharad Pawar’s Resignation Sakal-Saam TV Survey : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Resigns Sakal-Saam TV Survey : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शरद पवार यांच्या निर्णयाबद्दल राज्यातील समर्थकांना काय वाटते या बद्दल सकाळ आणि साम टिव्हीने एक सर्व्हे केला आहे.

यामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याबद्दल आपल्याला काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यात आले आहे. त्यामध्ये 73.4 टक्के कार्यकर्त्यांना वाटते की पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये. तर 24. 6 टक्के जणांना पवार यांनी योग्य केले असे वाटते. तर 2 टक्के जणांनी सांगता येत नसल्याचे म्हटले आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेस वगळून इतर पक्षातील 35. 64 टक्के कार्यकर्त्यांना वाटते की शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडू नये. तर 56.10 टक्के कार्यकर्त्यांना वाटते की पवार यांनी योग्य निर्णय घेतला. तर 8 टक्के कार्यकर्त्यांनी सांगता येत नसल्याचे म्हटले आहे.

पवार यांनी राजीनामा देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला हे योग्य आहे, असे 47.5 टक्के लोकांना वाटते. तर 45.9 टक्के लोकांना त्यांचा निर्णय योग्य नाही असे म्हटले आहे. इतरांनी याबद्दल सांगता येत नाही असा कौल दिला आहे.

या सर्व्हेमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांचा कल समजून घेतला. यामध्ये महिला, पुरुषांचा समावेश तसचे सर्व वयोगटातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT