मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भाषणाचे संकलन असलेल्या `नेमकचि बोलणे` या पुस्तकाचे प्रकाशन आज वेगळ्या प्रकारे पार पडले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. खुद्द पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेतेही या वेळी व्यासपीठावर नव्हते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे प्रेक्षागृहातील मागच्या रांगेत आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या तर शेवटच्या रांगेत बसलेल्या दिसल्या.
पवार हे मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री असतानाच्या काळातील भाषणांचा समावेश यात करण्यात आला आहे. साधारणपणे ८०-९०च्या दशकातील कालखंडातल्या भाषणे यात आहेत. राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांनी या भाषणांचे लिखाण आणि संकलन केले आहे. या पुस्तकातील भाषणांच्या काही भागाचे वाचन पत्रकार अनंत बागाईतकर, कलाकार कवी किशोर कदम, लेखिका मनस्विनी लता रविंद्र, अभिनेत्री चिन्मयी सुमित, कलाकार संदीप मेहता आणि शंभू पाटील यांनी केले. हे भाषण वाचल्यानंतर संबंधित वक्त्याने त्या अनुसरून पवार यांना प्रश्नही विचारले. पवार यांनाही ते आवडले. `पूर्वकाळातील भाषणांच्या संपादित संकलनाच्या प्रकाशनाचा धागा पकडून विविध क्षेत्रांतील लोकांशी संवाद साधता आला व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला याचे समाधान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पठारे, राऊत आणि भाषण वाचणारी ही मंडळीच व्यासपीठावर होती. शरद पवार, प्रतिभा पवार यांच्यासह छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक हे मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हे व्यासपीठावर न बसता खाली होते. जयंत पाटील हे तर मागच्या रांगेत दिसून आले. सुप्रिया सुळे एकदम शेवटच्या रांगेत बसलेल्या होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन खुद्द सुळे यांनी केले होते. या भाषणांचे संकलन व्हावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. तरीही त्यांनी बसण्यासाठी मागची रांग निवडली.
या कार्यक्रमात संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली. नेमके कसे बोलावे, हे समजण्यासाठी या पुस्तकाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून द्यावी, असा सल्ला त्यांनी खोचकपणे दिला. या पुस्तकाच्या कव्हरचा रंग भगवा आहे. याकडे पवार यांनी राऊत यांचे लक्ष वेधले. आपल्या महाआघाडी सरकारचाही हाच भगवा रंग आहे. अवघा रंग एक झाला आहे, असे सांगत हास्याचे फवारे उडवले. पवारही या हास्यात सहभागी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.