Ajit Pawar News Sarkarnama
विशेष

Shivsena News : शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अजित पवारांची डोकेदुखी वाढवणार?

Supreme Court News : सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मोठी अडचण होणार

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड केली. अजित पवार यांच्या वतीने आमदार अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड केली आहे. असे असले तरी अजित पवार यांची वाट सोपी नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मोठी अडचण असणार आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अजित पवार यांची डोकेदुखी वाढवण्याची शक्याता आहे. कारण न्यायालयाने निकाल देताना काही बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यानुसार विधिमंडळ पक्ष नसून राजकीय पक्षच प्रतोदाची नियुक्ती करतो. विशिष्ट पद्धतीने मतदान करणे किंवा अनुपस्थित राहाणे याचे आदेश राजकीय पक्ष देत असतो. विधिमंडळ पक्ष देत नाही.

पक्षफुटीनंतर आमदारांना अपात्रतेसं संरक्षण मिळण्याची सूट या प्रकरणात नाही. विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्ष कोणता आहे, हे ठरवून त्यावर आधारीत अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्याचा आहे. निर्णय घेताना दहाव्या परिशिष्टातील दुसऱ्या परिच्छेदाचा संदर्भ घ्यावा, जिथे दोन किंवा अधिक गट संबंधित राजकीय पक्ष असल्याचा दावा करत असतील.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे अजित पवार यांची अडचण होणार असल्याचे बोलेल जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला होता. आव्हाड यांनी राष्ट्रवादीची घटना वाचून दाखवत सांगितले होते की घटनेमध्ये राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना सर्व अधिकार आहेत. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांना पक्षातून निलंबीत केले. त्यामुळे त्यांना कोणत्याही नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले होते.

आव्हाड म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानुसार व्हीपची नेमणूक फक्त राजकीय पक्षाचा अध्यक्ष करु शकतो. यामुळेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी केलेली निवड आणि भरत गोगावले यांची व्हिप म्हणून केलेली निवड ही बेकायदेशीर ठरवली होती. फुटीर आमदारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटल्याचे आव्हाड यांनी सांगितले. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेला निर्णय अजित पवार यांची अडचण करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT