Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
विशेष

Maharashtra News Live Update : हिंगोलीत मराठा बांधवांनी राज्य महामार्ग रोखला...

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यातील राजकीय, प्रशासकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

Maratha Andolan : हिंगोलीत मराठा बांधवांनी राज्य महामार्ग रोखला...

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी विविध मागण्या मान्य करण्यासाठी रखरखत्या उन्हात आंदोलन सुरू केल्याने मराठा समाज आक्रमक होऊ लागला आहे. मराठा समाजाने हिंगोली रिसोड राज्य महामार्ग रोखला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीतील सेनगाव शहरातील टी पॉइंटवर मराठा बांधवांच आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

Pune Update : पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून एक लाखांची मदत

पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी येथे गावठी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत महापालिकेकडून जाहीर करण्यात आली. याबाबतची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने देखील मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यात यावी, असे आवाहन केले आहे. तसेच शहरातील गावठी दारू बनवणाऱ्या व्यक्तींविरोधात तक्रार दिल्यास तात्काळ त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा देखील त्यांनी दिला.

Palghar Update : समुद्रात मासेमारीला बंदी, 31 जुलैपर्यंत कठोर अंमलबजावणीचे प्रशासनाचा आदेश

पालघर जिल्हा प्रशासनाने 1 जूनपासून समुद्रात मासेमारी करण्यास बंदी लागू केली असून, ही बंदी 31 जुलैपर्यंत कायम राहणार आहे. पावसाळ्यातील वादळी हवामान, मच्छिमारांची सुरक्षितता आणि समुद्रातील मासळीच्या प्रजनन काळाचे संरक्षण या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार या कालावधीत सर्व यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित छोट्या नौकांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.

Nilesh Rane : पोलिस अधीक्षकांच्या कार्यपद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नुकसान; नीलेश राणे यांचे गंभीर आरोप

सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक यांचा कारभारामुळे जिल्ह्याचे नुकसान होत असून, अनैतिक धंद्याना मोहन दहिकर यांचा पाठींबा आहे, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी केला. दहीकर यांच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यंत बाराशे गुन्हे रजिस्टर झाले असून, माहिती दिली जात नाही, तसेच गुन्ह्यांची उकल होत नाही. माझा आक्षेप पोलिस विभागावर नसून, त्यांच्या बाॅसवर आहे. अवैध दारू ही जिल्ह्याला लागलेली कीड आहे. हे रॅकेट कार्यरत आहे, असाही घणाघात, आमदार नीलेश राणे यांनी केला.

प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पक्षप्रवेशाच्या आधी त्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि जननेत्या रेट्यामुळे तसेच विकासकामांमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करावे - विखे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करावे, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. ते म्हणाले, महाधिवक्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. कारण याला न्यायालयात आव्हान दिले जाते. चर्चा होत राहिली उपोषण करायेच असेल तर तूर्त सावलीत बसून करा, चर्चा होत राहील. उपोष सुरू ठेवा पण सावलीत ठेवा.

मनोज जरांगेंचे शेतात रणरणत्या उन्हात उपोषण सुरु, मंत्री विखे पाटलांनी घेतली भेट

मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली आहे. काही कागदपत्र दाखवत ते त्यांची चर्चा करत आहेत. मराठा आरक्षण कक्ष महिनाभरात सुरू करू, असे आश्वासन देखील त्यांनी जरांगे पाटील यांना दिले आहे.

शिवसेना आक्रमक, पुण्यातील दारुचे अड्डे उध्वस्त

पुण्यात महमदवाडी कृष्णानगर परिसरातील दारूचे अड्डे शिवसेनेकडून उध्वस्त केले. शिवसेना शिंदे गटाच्या शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी दारूचे अड्डे केले उध्वस्त केले. हडपसर परिसरातील सात जण विषारी दारूमुळे मृत्यू झाल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली. शिवसैनिकांनी आज सकाळी दोन ते तीन ठिकाणी दारूच्या उध्वस्त केले आहेत

मराठा समाज आक्रमक. समृद्धी महामार्ग रोखला

मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरवात केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक. झाला आहे. जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाने रस्ता रोको केला आहे. नाव्हा शिवारात मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला आहे.

CNG & PNG PRICE HIKE : महामुंबईत CNG 2 रुपयांनी महागला

मुंबईसह MMR क्षेत्रात सीएनजी पुन्हा वाढला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ केली. तर घरगुती पाइपद्वारे पुरवठा होणाऱ्या पीएनजीच्या दरात प्रति एससीएम ५० पैशांची वाढ केली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरवात झाली आहे.  मी आमरण उपोषणावर ठाम, असे मनोज जरांगे म्हणाले.

THANE, PALGHAR RAIN ALERT :ठाणे, पालघरला उद्या पावसाचा यलो अलर्ट

पालघर, ठाणे जिल्ह्यासाठी रविवारी हलक्या ते मध्यम सरी आणि सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही सोमवार, मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा 'यलो अॅलर्ट' आहे. गेल्या २४ तासांत केवळ कोकण विभागामध्ये तापमानवाढ नोंदली गेली आहे. मुंबईमध्ये उद्यापासून तीन दिवस हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषण करणार आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात अपयश आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT