Maithili Thakur Sarkarnama
विशेष

Maithili Thakur : मैथिली ठाकूर महिन्याभरात आमदार झाली; 25 वर्षांची गायिका कशी जिंकली? वाचा Inside Story

Maithili Thakur win bihar Election : फक्त महिन्याभरात 25 वर्षांची गायिका मैथिली ठाकूर आमदार कशी झाली? संगीतविश्वातून थेट राजकारणात पोहोचलेल्या प्रवासाची Inside Story येथे वाचा.

सरकारनामा ब्युरो

भाजपच्या उमेदवार आणि लोकगीत गायिका मैथिली ठाकूर यांनी दरभंगाच्या अलीनगर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मैथिली यांनी निवडणूक प्रचारात बरीच मेहनत घेतली. २५ वर्षीय लोकगीत गायिका ते तरुण नेता होणाऱ्या मैथिली यांनी ऑक्टोबर महिन्यांत भाजपमध्ये प्रवेश केला होता. अलीनगर मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार विनोद मिश्रा यांच्याविरोधात त्या उभ्या होत्या.

आजच्या निकालानंतर आपण बिहारच्या जनतेची सेवा करण्यासाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली. पराभवाचा विचार माझ्या मनालाही शिवला नाही आणि तसेच घडले व विजयी झाले, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. गेल्या तीस दिवसांत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. लोकांनी माझ्यावर टाकलेला विश्‍वास सार्थ करण्यास सज्ज आहे, असे त्या म्हणाल्या.

अलीनगर मतदारसंघात बारा उमेदवार मैदानात होते आणि या ठिकाणी ६०.१८ टक्के मतदान झाले. मागच्या निवडणुकीचा विचार केला तर २०१० मध्ये आरजेडीचे अब्दुल बारी विजयी झाले तर २०२० मध्ये या मतदारसंघातून मुकेश सहानी यांच्या व्हीआयपी पक्षाचे मिश्री लाल यादव हे निवडून आले होते. संगीत विश्‍वातून राजकीय विश्‍वात प्रवेश करणाऱ्या मैथिली ठाकूर यांनी मिथिलांचलच्या तरुण मतदारांची मने जिंकली आणि त्याची प्रचिती निकालातून दिसून आली.

भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांना लहानपणीच वडिलांकडून मिळाले. त्या मैथिली, भोजपूर आणि हिंदीत लोकगीत गायन करतात. त्या त्यांच्या भावंडासमवेत व्यासपीठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर असल्याने त्यांची लोकप्रियता अनेक समुदायात आहे. डिजिटल विश्‍वातील त्यांची व्याप्ती अलिनगर मतदारसंघात विजय मिळवून देण्यास उपयुक्त ठरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT