Mallikarjun Kharge News : काँग्रेसला बुधवारी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या रुपाने 24 वर्षात पहिला गैर-गांधी अध्यक्ष मिळाला आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. खर्गे यांना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सात हजार 897 मते मिळाली आहेत.
मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना मिळालेली ही मते सर्वाधिक आहेत. खर्गे यांचे प्रतिस्पर्धी खासदार शशी थरुर यांना एक हजार 072 मते मिळाली आहेत. या आधी झालेल्या काँग्रेस (Congress) अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सोनिया गांधी यांना सात हजार 542 मते मिळाली होती. तर जितेंद्र प्रसाद यांना ९४ मते मिळाली होती.
सीताराम केसरी यांना सात हजार 460 तर शरद पवार यांना 888 आणि राजेश पायलट यांना 354 मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या मागील तीन निवडणुकीमध्ये सर्वाधिक मते खर्गे यांना मिळाली आहेत. काँग्रेस च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जवळपास 9 हजार जणांनी मतदान केले आहे.
२४ वर्षामध्ये वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत खर्गे यांचा विजय झाला आहे. मात्र, त्यांच्यासमोर मोठी आव्हाहने देखील आहेत. कारण गेल्या काही वर्षात पक्षाचा बहुतांश निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. अनेक ज्येष्ठ नेतेही पक्ष सोडून गेले आहेत. बंडखोरीचे आवाज अधून मधून ऐकू येत असतात. त्यावर खर्गे यांना उपयो शोधावा लागणार आहे.
भाजप आणि मोदी-शहा जोडीला टक्कर देण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. ऐक्याचे प्रयत्न सामान्य वाटत असले तरी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधी एकता सुनिश्चित करण्यासाठी आणि विरोधकांची आघाडी, तसेत देशात पक्षाचे महत्त्व कसे टिकवायचे हे देखील मोठे आव्हान खर्गे यांच्यासमोर असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.