Manipur Politics and CM Biren Singh : ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून सुरू पेटलेली जातीय हिंसाचाराची आग अद्याप पूर्णपणे शमलेली नाही. हा हिंसाचार रोखण्यात अयशस्वी ठरलेले मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याची विरोधी पक्षाकडून सातत्याने मागणी होत होती. या दरम्यान मणिपूरमध्ये नेतृत्व परिवर्तनाच्या मागणीवरून भाजपच्या प्रदेश युनिटमध्ये सुरू असलेल्या खेचाखेचीत, मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी रविवारी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.
राज्यपालांनी सिंह आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा स्वीकारला. याचबरोबर त्यांना सूचना देखील केली की पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांनी पदावर कायम रहावं. ही घडामोड बीरेन सिंह(Biren Singh) हे दिल्लीतून परतल्यानंतर काही तासांनंतरच झाली. केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्याशी जवळपास दोन तास बैठक चालली, ज्यामध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित होते. यांनी बीरेन सिंह हे भाजपचे पूर्वोत्तर समन्वयक संबित पात्रा यांच्यासोबत इंफाळला परतले होते.
विरोधक प्रदीर्घ काळापासून बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. या आठवड्याच्या सुरुवातीस, एक नवा वाद तेव्हा उद्भवला होता, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जातीय हिंसाचारात बीरेन सिंह यांच्या भूमिकेवर आरोप करणारी लीक झालेली ऑडिओ क्लिपच्या प्रामाणिकतेबाबत एक सीलबंद फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला होता.
राजीनामा देण्याआधी बीरेन सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांची भेट घेतली होती. एन. बीरेन सिंह राज्यातील जातीय संघर्षावरून विरोधकांच्या कायम निशाण्यावर होते. सातत्याने सुरू असलेल्या टीकेमुळे बीरेन सिंह यांनी राजीनामा दिला असल्याची माहितीही समोर आली आहे. काँग्रेस विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा करत आहे. तर प्राप्त माहितीनुसार बीरेन सिंह हे काँग्रेसच्या या अविश्वास प्रस्तावापासून स्वत:ला वाचवू इच्छित होते. कारण, त्यांना त्यांच्या पक्षातील आमदारांचा पाठिंबा मिळेल की नाही, याचीही खात्री नव्हती. त्यामुळेच त्यांनी राजीनाम्याचा मार्ग योग्य समजला.
खरंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये ए के भल्ला राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यापासूनच बीरेन सिंह यांचा राजीनामा निश्चित समजला जात होता. आता त्यांचा राजीनामा मणिपूरमधील विधानसभा सत्र सुरू होण्याच्या बरोबर आधीच आला आहे. एवढंच नाहीतर काही रिपोर्टनुसार बीरेन सिंह यांच्यावर मणिपूरमधील अनेक भाजप आमदारही नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी दर्शवत एकप्रकारे दबाव आणणे सुरू केला होता.
आतल्या गोटातून अशीही माहिती समोर आली आहे की, एका भाजप आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर हे देखील सांगितलं की, जर बीरेन सिंह यांनी राजीनामा दिला नसता, तर काँग्रेसकडून(Congress) अविश्वास प्रस्ताव दाखल झाला असता आणि पुढे मग भाजपसाठी लाजीरवाणी परिस्थितीही निर्माण झाली असती. कारण, जवळपा पाच ते दहा भाजप आमदारही विरोधात बसण्याची आणि बीरेन सिंह यांना पाठिंबा न देण्याच्या भूमिकेत होते. या आमदारांमध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे आणि याबाबत बीरेन सिंह यांना कल्पना आली होती व भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासही याबाबत वेळोवेळी सूचित केले गेले होते. त्यामळेच बीरेस सिंह यांनी अखेर राजीनामा दिला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.