Maharashtra CM Devendra Fadnavis with ministers announcing restructured Maratha reservation subcommittee. Sarkarnama
विशेष

Maratha reservation : फडणवीसांची मोहीम आता विखे पाटील फत्ते करणार?

Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट उपसमितीची पुनर्रचना केली. राधाकृष्ण विखे पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या समितीची कार्यपद्धती काय असणार?

Hrishikesh Nalagune

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाविषयक विशेष मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना केली आहे. यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जागी उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. या उपसमितीत एकूण 11 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण ही उपसमिती नक्की काम काय करणार? असे प्रश्न विचारले जात आहे.

उपसमिती काम काय करणार?

मराठा आरक्षणविषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवणे, न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये सरकारची बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवणे, न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यपद्धती ठरवणे, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना दाखले देण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीशी समन्वय राखणे ही प्रमुख जबाबदारी या उपसमितीवर असणार आहे.

याशिवाय मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे, मराठा समाजासाठी घोषित योजना तसेच सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेऊन सनियंत्रण करणे, जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय घेऊन प्रक्रिया सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करणे, अशी कार्यपद्धती उपसमितीला ठरवून दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मात्र या निर्णयावर टीका करत "पोळ्यादिवशी फक्त खांदे बदल झाले आहेत, येड्यात काढायचं बंद करा. लोकांना माहिती आहे उपसमिती आधीच स्थापन केली आहे. बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका, ते ऐकण्यात आम्हाला रस नाही.आमच्या मागण्या आहेत त्या मान्य करा. तुम्ही अंमबजावणी केली नाही तर आम्ही मुंबईत येणार.', असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगेंचं आंदोलन :

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आरपारची लढाई छेडली आहे. येत्या 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. जरांगेंच्या या आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका, पोलिस प्रशासन यांच्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT