Dr. Amol Kolhe LokSabha Tv
विशेष

शिवरायांच्या अवमानावर बोलणारे अमोल कोल्हेंचा माईक बंद केला : महाराष्ट्रात संतापाची भावना

संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसविल्याशिवाय राहणार नाही

सरकारनामा ब्यूरो

रवींद्र पाटे/ डी. के. वळसे पाटील

नारायणगाव/मंचर (जि. पुणे) : संसदेतला माईक बंद केला, तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची (Chhatrapati Shivaji Maharaj) भावना दाबता येणार नाही. तमाम शिवभक्तांचा आवाज तुमच्या कानठळ्या बसविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी ठणकावत संविधानिक पदावर असो वा इतर कुणालाही महापुरुषांचा अवमान करण्याचे धारिष्ट्य होऊ नये, यासाठी कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेतील अधिवेशनादरम्यान केली. (Microphone of MP Amol Kolhe, who spoke on insulting Shivaji Maharaj, was turned off)

दरम्यान, कोल्हे व इतर खासदारांना छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्नाटकाच्या दादागिरीसंदर्भात बोलू न दिल्याने महाराष्ट्रातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. लोकसभेतील भाजप नेत्यांच्या वागण्याबद्दल राज्यातून संताप व्यक्त हेात आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचे प्रकार महाराष्ट्रात होत आहेत. विशेष म्हणजे संविधानिक व जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींकडून हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे संसदेतील अधिवेशनाच्या शून्य प्रहरात या विषयावर बोलण्याची संधी मिळावी, अशी विनंती केली होती. त्या नुसार बोलण्याची संधी दिली. मात्र दोन-तीन वाक्य बोलताच माईक बंद करण्यात आला. त्याही परिस्थितीत तीव्र शब्दांत भावना व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही. तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसविल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. कोल्हे यांनी या वेळी ठणकावले.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, केवळ महाराष्ट्राच नव्हे; तर अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज देव नसले तरी आम्हा शिवभक्तांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. पण, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह कोणत्याही महापुरूषांचा अवमान करण्याचे कुणाचेही अगदी संविधानिक व जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तींचेही धारिष्ट्य होऊ नये, यासाठी संसदेने कायद्यात ठोस तरतूद करण्याची गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT