Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
विशेष

किर्तीकरांच्या माध्यमातून ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न; लोकाधिकार समिती अन् कार्यकारिणीवर डोळा

सरकारनामा ब्यूरो

Gajanan Kirtikar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करुन अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावले आहे. त्यातच आता खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश केला.

गजानन किर्तीकर यांच्या मुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. किर्तीकर हे मुंबईतील खासदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला आपल्या बालेकिल्ल्यातच धक्का बसला आहे. येवढेच नाही तर किर्तीकर यांच्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो. किर्तीकर यांना घेत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा शह दिला आहे. कारण गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत.

तसेच ते शिवसेनेच्या स्थानिक लोकाधीकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्याच बरोबर ते शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीनीमध्ये आहेत. त्यामुळे शिंदे यांनी किर्तीकर यांच्या रुपाने ठाकरे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. लोकाधीकार समिती शिवसेनेची महत्त्वाची समिती आहे. किर्तीकर हे समितीचे अनेक वर्ष अध्यक्ष आहेत. त्यांचा या समितीमध्ये मोठा दबदबा होता. त्यामुळे या समितीतही फुट पडू शकते.

गजानन किर्तीकर हे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीनेचे सदस्य आहेत. तसेच ते शिवसेनेचे उपनेते देखील आहेत. ठाकरे यांनी त्यांची उपनेते पदावरुन हाकालपट्टी केली आहे. शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी सुद्धा पक्ष संघटनेवर ठाकरे यांचे वर्चस्व होते. मात्र, किर्तीकर यांच्यामुळे शिवसेनेच्या लोकाधीकार समितीमध्येही फूट पडू शकते. त्याच प्रमाणे राष्ट्रीय कार्यकारीनीतील सदस्य आपल्या बाजूला वळवण्यात शिंदेंना यश मिळू शकते, असे सांगितले जात आहे. यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसू शकतो.

खरी शिवसेना कोणाची याची लढाई निवडणूक आयोगामध्ये सुरु आहे. सध्या निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव दिले आहे. मात्र, खरी शिवसेना कोणाची यावर अजून आयोगाचा अंतिम निर्णय यायचा आहे. दोन्ही गटांनी प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक कागदपत्रे आयोगाला सादर केली आहेत. किर्तीकर यांच्यामुळे शिंदे गटाला अधिक बळ मिळू शकते. त्यामुळे शिंदे यांनी किर्तीकरांच्या माध्यमातून ठाकरेंच्या समोर आव्हान उभे केले आहे.

शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना आहे. दहा हजारांहून अधिक सदस्य या संघटनेचे आहेत. लोकाधिकार समिती मुंबई आणि महाराष्ट्रात स्थित विमा, तेल, विमान वाहतूक, रेल्वे, संशोधन, केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये सक्रिय आहे. राज्यातील 80 टक्के नोकऱ्यांमध्ये मराठी भाषिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी ही समिती काम करते. लोकाधिकार समितीचे कमान खासदार गजानन कीर्तिकर आणि राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांच्याकडे होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT