1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते
2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
3.उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
4. चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
5. राधाकृष्ण विखेपाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
6. हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
7. चंद्रकात पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
8. गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
9. गणेश नाईक - पर्यटन
10. गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
11. दादा भुसे - शालेय शिक्षण
12. संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
13. धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
14. मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
15. उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
16. जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
17. पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
18. अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतणीकर
19. अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
20. शंभुराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये गृहखातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थखातं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं असणार आहे.
मंत्रीमंडळ खातेवाटपाबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पत्रकारपरिषदेत मोठं विधान केलं. खाते वाटप हे लवकरच जाहीर होईल, ते आजही होवू शकतं किंवा उद्या सकाळपर्यंत होवू शकतं, असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पत्रकारपरिषदेत बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडला माझ्या परवानगीनेच गेले आहेत, त्यामुळे ते सध्या हजर नाहीत. असे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या पत्रकारपरिषदेत बोलताना हे अधिवेशन यशस्वी झाल्याचे सांगतिले, तसेच विनोदी अधिवेशन म्हणणाऱ्या विरोधकांवरही टीका केली.
कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने 10 ते 15 गुंडांना बोलावून एका मराठी कुटुंबाला मारहाण केली होती. या प्रकरणाचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. या प्रकरणात अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला आणि इतर चार जणांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शुक्ला याने गुंडांना बोलावून हा हल्ला केला होता. यात आणखी पसार असलेल्या आरोपींना पकडायचे आहे. मारहाण वेळी वापरलेली शस्त्र जप्त करायची आहेत. मारहाणीचा कट रचला गेल्याचे प्रथमदर्शनी दिसते. वाहनाला अंबर दिवा लावण्याचा नेमका काय प्रकार आहे, याचा शोध घ्यायचा असल्याचा सरकार पक्षातर्फे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला.
ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेत आलेल्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीला उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी भेट देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली. येत्या पाच जानेवारीला उद्धव ठाकरे, तर 10 जानेवारीला राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल मारकडवाडीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी आणि मतदारांशी ईव्हीएम मशीन विषयी चर्चा करणार आहेत. मारकवाडी गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली होती. दरम्यान प्रशासनाने त्यांची ही तयारी हाणून पडली. त्यानंतर मारकवाडी हे गाव देशभर चर्चेत आले. याच दरम्यान शरद पवार यांनी देखील मारकडवाडीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर येत आहेत. मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे. शरद पवार यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची आज भेट घेत, सूर्यवंशी यांच्या कुंटुबियांचे सांत्वन केले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबरोबर झालेला प्रकार गंभीर आहे. सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठी संपूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभं असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले. आता राहुल गांधी उद्या परभणीत येत सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहे.
परभणी इथं मयत सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी शरद पवार पोचले असून, सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद साधला. मयत सोमनाथ यांची आईने माझा मुलगा दोषी नव्हता. त्याचा खून केला आहे. दोषींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. सोमनाथला कोणताही आजार नव्हता. तसंच घरात शिक्षण घेणारा तो पहिलाच होता. सोमनाथ याचा मृतदेह घेऊन जाताना पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप मयत सोमनाथ याच्या भावाने केला.
IPS Navneet Kanwat यांची बीड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपासात कुचराई केल्याच्या ठपका ठेवत बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. अविनाश बारगळ हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. अविनाश बारगळ यांनी 7 ऑगस्ट 2024 ला पोलिस अधीक्षक म्हणून पदभार हाती घेतला होता. यानंतर बीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आली आहे. IPS Navneet Kanwat हे बीडचे नवीन पोलिस अधीक्षक राहणार असून, ते यापूर्वी पोलिस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत होते. आता बीडमधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचे आवाहन कावत यांच्यासमोर असणार आहे.
शरद पवार यांनी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर खासदार नीलेश लंके, खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार राजेश टोपे आदी नेते होते. देशमुख कुटुंबियांकडून शरद पवार यांनी घटनाक्रम समजावून घेतला. देशमुख कुटुंबियांनी घटनेत पोलिस प्रशासनाचा हलगर्जीपणावर ठपका ठेवला. तसेच बीडमध्ये वाढलेल्या गुंडगिरी रोखा, देशमुख परिवाराला न्याय मिळवून द्यावा, पसार आरोपींना तत्काळ अटक व्हावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी देशमुख कुटुबियांनी शरद पवारांकडे केली.
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा आग्रह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आहे. तसा निरीक्षकांच्या अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे सादर झाला आहे. यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनायुबीटीचे नेते संजय राऊत यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यावर आम्ही देखील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बोलून निर्णय घेणार असल्याचे म्हटले. यामुळे महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकत्रितपणे समोरे जाणार नसल्याचे दिसते. महाविकास आघाडीत बिघाडीवर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी टोलेबाजी केली आहे.
मुद्रांक सुधारणा विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर झाले आहे. यानुसार मुद्रांक शुल्कसाठी आता 500 रुपये मोजावे लागणार आहे. व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी हे विधेयक दुरुस्ती विधेयक आणण्यात आल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. राज्यात विविध 12 प्रकारच्या दस्तांसाठी 100 आणि 200 रुपयांऐवजी आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. मात्र हे शुल्क आकारताना सामान्य नागरिकांवर त्याचा कोणताही भार पडणार नसल्याची ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
ज्येष्ठ नेते शरद पवार आज बीड आणि परभणी जिल्हा दौऱ्यावर असून, प्रशासनाकडून अलर्ट मोडवर आहे. शरद पवार बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे सर्व खासदार असणार आहेत. या दोन्ही कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शरद पवार दुपारी दोन वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहे. दरम्यान, शरद पवार मस्साजोग गावाला सकाळी दहा वाजता जाणार होते. परंतु वातावरणातील बदलामुळे त्यांचा दौरा एक तास पुढे, म्हणजेच 11 वाजता उशिराने होईल.
संसद भवनाच्या आवारात सत्ताधारी पक्षाचे खासदार प्रतापचंद्र सरंगी आणि मुकेश राजपूत यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी भाजपकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हक्कभंगाची नोटीस देखील बजावण्यात आली. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल यांच्याविरोधात हक्कभंगाची आणि सभागृहाचा अपमान केल्याची नोटीस बजावली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेले आणि मंत्रिमंडळातून डावलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा शरद पवारसाहेंबाकडे आले, तर स्वागत होईल, अशी प्रतिक्रिया खासदार नीलेश लंके यांनी दिली. पण ते आपल्या संपर्कात नाहीत, असे खासदार लंके यांनी सांगितले. छगन भुजबळ मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईतील कुर्ला बस अपघातामधील आरोपी चालक संजय मोरे याची आज पोलिस कोठडी संपत असून, त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जात आहे. संजय मोरे याला न्यायालयाने 11 दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. या कालावधीत अपघातप्रकरणी काय तपास केला, याची माहिती देखील पोलिस न्यायालयासमोर ठेवणार आहे. हा अपघात नऊ डिसेंबरला झाला होता. यात नऊ जणांचा मृत्यू झाला.
महायुती सरकारचे खातेवाटप लांबले आहे. अधिवेशनानंतर नाताळच्या सुट्ट्या लागणार आहे. या काळात नाराजी व्यक्त करणाऱ्यांना वेळ मिळणार नाही. त्यामुळे जे काही करायचे ते अधिवेशन संपल्यानंतर किंवा शेवट्या दिवशी, अशी माहिती समोर आली आहे. आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल, असे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.