Radhakrishna Vikhe Patil, Haribhau Bagade, Deepak Kesarkar
Radhakrishna Vikhe Patil, Haribhau Bagade, Deepak Kesarkar Sarkarnama
विशेष

विधानसभा अध्यक्षपदासाठी विखे पाटील, बागडे, केसरकरांची नावे आघाडीवर!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade), तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, विखे पाटील आणि केसरकर यांची नावे आघाडीवर आहेत. आज संध्याकाळी होणाऱ्या भाजपच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षाच्या (Assembly Speaker) नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. (Names of Vikhe Patil, Bagde and Kesarkar in the lead for the post of Assembly Speaker)

महाविकास आघाडी सरकारच्या पतनानंतर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सहकार्याने नवे सरकार सत्तेवर आरुढ झाले आहे. राजभवनात गुरुवारी मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर पुढील घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेचे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी बोलविण्यात आले आहे. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची नावं चर्चेत आहेत. त्यातही राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. भाजप आमदार यांची आज संध्याकाळी बैठक होणार आहे, त्या बैठकीत वरील नावांवर चर्चा होणार आहे. या चर्चेतून विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दीपक केसरकर यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहेत. शिवसेना शिंदे गट असल्याने उद्धव ठाकरे गटांच्या आमदारांवर नियंत्रण ठेवणासाठी केसरकर हे उपयोगी पडतील, त्यामुळे केसरकर यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT