Navneet Rana
Navneet Rana Sarkarnama
विशेष

Navneet Rana : लोहा जितना तपता है. उतनीही ताकद भरता है! नवनीत राणांनी पुन्हा दम भरला

Rashmi Mane

Amravati News : ठाकरेंना 'चॅलेंज'वर' चॅलेंज' देत, थेट मातोश्रीच्या अंगणात येऊन हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेत आलेल्या आमरावतीच्या खासदार नवनीत राणांचा दारुण पराभव झाला. आपल्याविरोधात कोणीही कितीही मोठा उमेदवार दिला तरी; मोदी-शहांच्या करिष्म्यावर 'मीच खासदार' होणार असल्याचे ठणकावून सांगणाऱ्या राणांचा 20 हजार मतांनी काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी पराभव केला. ही हार राणा दांम्पत्यांना वठणीवर आणणारी ठरली.

पण, 'हर एक संकट का हल होगा. वो आज नही, तो कल होगा. लोहा जितना तपता है. उतनीही ताकद भरता है ! अशा 'वजन'दार शब्दांत 'कॉन्फिडन्स' भरणारा 'व्हिडिओ' नवनीत राणांनी (Navneet Rana) शेअर केला आहे. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिंब्याने नवनीत राणा पहिल्यांदा अपक्ष खासदार झाल्या.

त्यानंतर केंद्रात दसऱ्यांदा मोदी सरकार येणार असल्याने राणांनी आपली खासदारकी भाजपच्या पारड्याकडे फिरवली. त्यानंतर 'महाशक्ती'च्या प्रोत्साहाने राणांनी हिंदुत्वासाठी आपला आवाज चढवला. दिल्लीत वजन वाढताच, नवनीत राणा राज्यात भल्याभल्यांशी पंगा घेऊ लागल्या. अमरावतीत माजी मंत्री यशोमतीताई (Yashomati Thakur), बच्चूभाऊंना वाटेल त्या मुद्यावरून राणा आक्रमकपणे बोलत राहिल्या.

पुढे तर आघाडी सरकारच्या काळात म्हणजे ठाकरे मुख्यमंत्री असताना राणा त्यांना हिंदुत्वावरून डिवचत राहिल्या. त्या हनुमान चालिसेच्या मुद्यावरून ठाकरेंविरोधात रणशिंगच फुंकले. ते बोलण्यापुरते न ठेवता डायरेक्ट मातोश्रीत येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे चॅलेंज ठाकरेंना दिले. त्यावरून त्या काळात राजकीय वातावरण तापले. आपला शब्द खरा करण्याच्या हेतुने राणा मातोश्रीकडे निघाल्याही. तेव्हा सरकार असल्याने ठाकरेंनी जशास तसे उत्तर देण्याचा पवित्रा घेतला.

मातोश्रीकडे येऊन दाखवाच, असे प्रतिआव्हान देत, ठाकरेंच्या सैनिकांनी राणांना बघून घेण्याची भाषा केली. त्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या सैनिकात संघर्ष झाला. हनुमान चालिस पठण करण्यावर ठाम राहिलेल्या राणांना अटक झाली. त्या कोठडीत गेल्या. तुरुंगवारीहून परतलेल्या शांत राहिल्या का, तर शंभर टक्के नाही. उलट पुन्हा संधी मिळेल, तशा त्या ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवत राहिल्या.

कालांतराने सत्तांतर झाले, ठाकरेंचा मुख्यमंत्रीपद गेले, तेव्हा तर नवनीत राणांनी हनुमान चालिसा पठण करण्याला रोखल्याने ठाकरेंवर हे दिवस ओढावल्याचे सांगून टाकले. ठाकरेंची सत्ता गेल्यावर त्यांना आनंदच आनंद झाल्याचे दिसून आले. ठाकरे नडल्यापासून राणांविरोधात रोष वाढत केला. त्यानंतर यशोमतीताईंना त्या वैयक्तिक बोलल्या. त्यामुळे नाराजी वाढत गेली. निवडणुकांच्या तोंडावर साड्या वाटपानंतरही नवनीत राणांनी मतदारांचा राग ओढून घेतला. त्यामुळे राणा पुन्हा खासदार होणार नाहीत, याची चर्चा अमरावतीच्या वर्तुळात होती. अगदी तसे घडले.

विशेष म्हणजे, यशोमतीताईंनी दिल्लीत हट्ट करून बळवंत वानखेडेंसाठी तिकिट आणले. त्यापलीकडे जाऊन त्यांना निवडून आणले. यानिमित्ताने यशोमतीताई नवनीत राणांना धडा शिकवला तर मतदारांनीही त्यांना जागा दाखवून दिली. राणांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जंगी सभा घेऊनही राणा हरल्या. निकालानंतर तिसऱ्या दिवशी राणांनी व्हिडिओ शेअर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT