NCP's decision regarding Nawab Malik News, Jitendra Awhad News, Rajesh Tope News  Sarkarnama
विशेष

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय : नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री; जबाबदारी या मंत्र्यांकडे!

कौशल्य विकास मंत्रीपद राजेश टोपे यांच्याकडे; तर अल्पसंख्याक विभाग जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडील मंत्रीपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याकडील कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे, तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे मलिक हे बिनखात्याचे मंत्री राहणार आहेत.(NCP's decision regarding Nawab Malik News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाचे राज्यातील मंत्री आणि प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हा, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे आदी महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यात मलिकांकडील मुंबईचे अध्यक्षपद, पालकमंत्री आणि मंत्रीपदाची जबाबदारीबाबत निर्णय घेण्यात आला.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मलिक यांच्याकडे असलेल्या गोंदिया आणि परभणीच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार काढण्यात आला आहे. त्यात परभणीचे पालकमंत्रीपद सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे, तर गोंदियाचे पालकमंत्रीपद ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

मंत्री मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्यावर पक्ष आजही ठाम आहे. पण, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदाचा, तसेच पालकमंत्रिपदाचा कार्यभार इतर नेत्यांकडे देण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेत अध्यक्षपदासाठी नगरसेविका राखी जाधव यांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्याकडे अध्यक्षपद किंवा कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्याची चर्चा सिल्व्हर ओकवरील बैठकीत झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा निर्णय घेणार का? याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT