Gangster Nilesh Ghaywal escapes to London, questions raised on Pune Police and Commissioner Amitesh Kumar. Sarkarnama
विशेष

Nilesh Ghaiwal News : पुणे पोलिसांचा दरारा, इभ्रत मातीत मिळवून गुंड निलेश घायवळ पळाला... राजकीय पॉवर ठरली भारी?

Nilesh Ghaiwal News : कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ परदेशात लंडनला पळून गेला असून, हे पुणे पोलिस आणि आयुक्त अमितेश कुमार यांचे मोठे अपयश ठरल्याची टीका होत आहे.

ब्रिजमोहन पाटील

Pune Police News : कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ परदेशात म्हणजे लंडनला पळून गेला आहे, त्याने कोट्यावधी रुपयांची माया जमवली असून, त्यातूनच लंडनमध्ये त्याने घर घेतले आहे. त्यामुळे तिकडे पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत. पण प्रश्‍न असा आहे की निलेश घायवळ गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून गुन्हेगारीत आहे. त्याच्यावरील गुन्ह्यांची संख्या कमी होण्याचे सोडा दरवर्षी नवनवीन गुन्हे पुण्यसह अन्य जिल्ह्यात दाखल होतात. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे जवळपास दोन डझन गुन्हे दाखल आहेत. शेकडो गुन्हेगारांची गँग सांभाळणारा निलेश घायवळ परदेशात पळून गेला हे जरा विशेष आहे.

यात पोलिसांचे अपयश आहे तर का आहेच. पण प्रश्‍न तेवढाच नाही. डझनभर गुन्हे दाखल असताना घायवळला पासपोर्ट मिळालाच कसा? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. साधा मारामारीचा किंवा किरकोळ गुन्हा दाखल असला तरी सामान्य नागरिकांना पासपोर्ट मिळत नाही. गुन्हा दाखल नसतानाही पोलिस व्हेरिफिकेशन करताना बहुतांश लोकांची घाबरगुंडी उडालेली असते. चूक नसतानाही पैसे देऊन पोलिस व्हेरिफिकेशन क्लियर करून घेणारी जमात आपल्याकडे आहे. असे असताना या गँगस्टरला कसा काय पासपोर्ट मिळू शकतो?

हा पासपोर्ट पुण्यातून मिळाला आहे की अन्य जिल्ह्यातून दिला गेला आहे याची माहिती एका क्लिकवर पोलीस बाहेर काढू शकतात. पण अजूनपर्यंत ही माहिती समोर आलेली नाही. घायवळला पासपोर्ट मिळणे, लंडनचा व्हिसा मिळणे ही बाब पोलिसांच्या दराऱ्याचा पार फज्जा उडवणारी घटना आहे. निलेश घायवळला पासपोर्ट कधी मिळाला? हा पासपोर्ट मंजूर करणारे अधिकारी कोण होते? त्याच्या पासपोर्टसाठी शिफारस करणारे नेते कोण होते? ही माहिती समोर यायला पाहिजे.

पण समजा हे काहीच घडले नसले तर मग निलेश घायवळ हा लंडनला पळून गेलेला नाही. तो भारतातच कुठे तरी सुरक्षित लपून बसला असेल. तो लंडनला गेला ही बातमी पेरून त्याची अटक टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे असे समजूयात. फार तर तो पासपोर्ट नसताना नेपाळ, भुटानला जाऊ शकतो. पण लंडनला जाऊ शकणार नाही. पण हे सगळं राजकीय आश्रय मिळाल्याशिवाय तो करू शकणार नाही.

काही महिन्यांपूर्वी मारणे गँगच्या गुंडांनी एका तरुणाला विनाकारण मारहाण केली होती. तो तरुण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणारा असल्याचे समोर आले. त्यानंतर गुंड गजानन मारहणेसह टोळीवर कारवाई झाली. याच पद्धतीने कोथरूडमध्ये सामान्य व्यक्तीवर विनाकारण गोळीवर झाला, त्यात निलेशला अटक होणार होती. पण तेवढ्यात तो गायब झाला आणि थेट लंडनला पोचल्याची बातमी समोर आली. त्यामुळे आता निलेशला पारपोर्ट कोणी दिला? प्रश्‍न असा आहे. जर त्याने यापूर्वीच पासपोर्ट काढला असेल तर पोलिसांनी तो ताब्यात का घेतला नव्हता? पण अशा अनेक प्रश्नांची उत्तर पोलीस देणार नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT