Dhananjay Munde News, Prajakt Tanpure News, Nawab Malik News, NCP Political News
Dhananjay Munde News, Prajakt Tanpure News, Nawab Malik News, NCP Political News Sarkarnama
विशेष

धनंजय मुंडे होणार परभणीचे पालकमंत्री; गोंदिया तनुपरेंकडे : मलिकांकडील जबाबदारी काढली

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय शरद पवार (sharad Pawar) यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथील पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर मलिक यांच्याकडे असलेल्या गोंदिया आणि परभणीच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार काढण्यात येणार आहे. त्यात परभणीचे पालकमंत्रीपद सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे, तर गोंदियाचे पालकमंत्रीपद ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. (Parbhani & Gondia as Guardian Ministe from Nawab Malik removed)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाचे राज्यातील मंत्री आणि प्रमुख नेत्यांची सिल्वर ओकवर बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे आदी महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यात मलिकांकडील मुंबईचे अध्यक्षपद आणि पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली. (NCP Political News Updates)

मंत्री मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्यावर पक्ष आजही ठाम आहे. पण, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदाचा, तसेच पालकमंत्रिपदाचा कार्यभार इतर नेत्यांकडे देण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेत अध्यक्षपदासाठी नगरसेविका राखी जाधव यांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्याकडे अध्यक्षपद किंवा कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्याची चर्चा सिल्व्हर ओकवरील बैठकीत झाली.

याच बैठकीत नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या पालकमंत्रिपदाबाबतही चर्चा झाली. मलिक सध्या गोंदिया आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे परभणीची, तर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पवार यांची भेट निघून गेले होते. नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतरही त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊ नये, अशी भूमिका आजच्या बैठकीतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते. मात्र, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडील मुंबई अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्याकडे देण्याबाबत चर्चा झाली. त्यात चर्चेत राखी जाधव यांचे नाव पुढे आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा निर्णय घेणार का? याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT