Vijay Vadettivar
Vijay Vadettivar Sarkarnama
विशेष

मोठी बातमी : ओबीसी महामंडळाच्या कर्ज वसुलीस स्थगिती : मंत्री वडेट्टीवारांची घोषणा

हेमंत पवार

कऱ्हाड : ओबीसी महामडळांच्या कर्जाची वसुली अनेक वर्षे झाली नाही. महामंडळाने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला होता. वसुलीसाठी काहींवर न्यायालयात खटलेही दाखल झाले आहेत, त्यामुळे महामंडळाचे पाच-दहा वर्षांपूर्वीच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात येईल. त्याचबरोबर न्यायालयात ज्या केसेस घातल्या आहेत, त्याही मागे घेण्यात येतील, अशी घोषणा ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज (ता. १८ एप्रिल) येथे केली. (Postponement of OBC Corporation Debt Recovery : Announcement by Minister Vijay Wadettiwar)

दरम्यान, ओबीसी समाजासाठी महात्मा फुले घरकुल योजना आणणार असल्याचीही घोषणा वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना केली. काँग्रेसच्या ओबीसी विभागाचा मेळाव्यात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षस्थानी होते. ओबीसीचे प्रदेशाध्य़क्ष भानुदास माळी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा निलम येडगे आदी उपस्थित होते.

मंत्री वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यास रस्त्यावरची लढाई लढू असे सांगून ते म्हणाले की, जो महाराष्ट्र शांत होता. त्याला दृष्ट लावण्याचे काम काही भोंगेबाज करत आहेत. त्यांना काहीच काम नसल्याने ते भोंगे वाजत आहेत. धर्माधर्मांमध्ये भांडणे लावून स्वतःची पोळी भाजण्याचे काम काही जणांकडून सुरु आहेत. त्यात काही मृत्यू झाले तर टाळूवरील लोणी खाण्यासाठी काही डोमकावळे टपले आहेत. ते महाराष्ट्राला उद्‌ध्वस्त करू पहात आहे, त्यापासून ओबीसी समाजाने दूर राहावे. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी प्रतिष्ठा बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय धरेन, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT