Rahul Gandhi, Ashok Chavan, Balasaheb Thorat, Nana Patole
Rahul Gandhi, Ashok Chavan, Balasaheb Thorat, Nana Patole sarkarnama
विशेष

राहुल गांधींच्या यात्रेसाठी काँग्रेस नेत्यांची तयारी; चव्हाण, थोरातांचा चालण्याचा सराव तर...

रश्मी पुराणिक

Bharat Jodo Yatra News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली 'भारत जोडो' यात्रा ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी देगलूर मार्गे महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच नेत्यांनी यात्रेत चालण्यासाठी व्यायाम करण्यास सुरुवात केली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा कन्याकूमारी पासून सुरु झाली आहे. या यात्रेमध्ये राहुल गांधी दिवसाला २५ किमी चालत असल्याने या यात्रेत चालण्यासाठी, स्टॅमिना टिकवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी व्यायाम करण्यास सुरुवात केली आहे.

भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेस (Congress) नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) चालण्याचा सराव करत आहेत. सतेज पाटील, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांचीही तयारी जोरदार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच व्यायाम करत असतात, त्यामुळे त्यांची पण तयारी जोमात आहे.

नॅशनल फुटबॉल खेळाडू असलेले विश्वजित कदम नेहमीच जॉगिंग करतात. भारत जोडो यात्रेसाठी कदम हे सहा किमी जॉगिंग दररोज करत आहेत. त्यामुळे संघटना पातळीवर यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरु असली तरी वयक्तीक पातळीवरही नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंतची ही भारत जोडो यात्रा असणार आहे. ७ नोव्हेंबरला सायंकाळी तेलंगणाच्या सीमेवरून देगलूर मार्गे महाराष्ट्रात यात्रा दाखल होणार आहे. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेला सर्वच राज्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. सर्वसामान्यांमध्ये यात्रेबद्दल प्रचंड उत्सूकता, आकर्षण आहे. केवळ काँग्रेसचीचीच ही यात्रा नाही, तर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना व सर्वसामान्यांचा देखील या यात्रेत सहभाग असणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT