chandrakant patil ravindra dhangekar sarkarnama
विशेष

Ravindra Dhangekar: शिवसेना प्रवेशानंतर 'मिस्टर इंडिया' झालेल्या धंगेकरांची अखेर गौतमी पाटील प्रकरणात 'एन्ट्री'; चंद्रकांतदादाच पुन्हा 'टार्गेट'

Ravindra Dhangekar Political News : काँग्रेसमध्ये असताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोर्शे कार अपघात, ससून ड्रग्स रॅकेट, ललित पाटील प्रकरण आणि पुण्यातील गुन्हेगारी अशा विविध विषयांवर आक्रमक भूमिका मांडत सरकारला धारेवर धरलं होतं.

Sudesh Mitkar

Pune News : काँग्रेसमध्ये असताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोर्शे कार अपघात, ससून ड्रग्स रॅकेट, ललित पाटील प्रकरण आणि पुण्यातील गुन्हेगारी अशा विविध विषयांवर आक्रमक भूमिका मांडत सरकारला धारेवर धरलं होतं. मात्र विधानसभेमध्ये झालेल्या पराभव नंतर धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

'मूळात 'मवाळ' पिंड असलेल्या काँग्रेसमध्ये असताना रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आक्रमक मूडमध्ये दिसून येत होते,पण तेच आक्रमकता ज्यांचा श्वास आहे,त्या शिवसेनेत आल्यावर सायलेंट मोडवर गेल्याचं मागच्या सात ते आठ महिन्यांपासून पाहायला मिळालं होतं. शिवसेनेतील प्रवेशानंतर ते जणू 'मिस्टर इंडिया' झालेत का ? असंही त्यांचे विरोधक सवाल करत होते. त्याबाबत 'सरकारनामा'ने देखील व्हेअर इज धंगेकर अशा आशयाची बातमी करत 'सायलेंट धंगेकर पॅटर्न'वर भाष्य केलं होतं.

त्यानंतर अखेर शिवसेनेचे महानगरप्रमुख पद असलेले रवींद्र धंगेकर शनिवारी(ता.4) त्यांच्या जुन्या स्टाईलमध्ये परतल्याचं दिसून आलं. धंगेकर यांची प्रलंबित आणि बहुचर्चित एन्ट्री ही थेट सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळाली, तीही सध्या पुण्यात गाजत असलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील कार अपघात प्रकरणात. त्यांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे करत असताना त्यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरती देखील जोरदार निशाणा साधला.

त्यामुळे 'सायलेंट मोड' वरून बाहेर आलेले धंगेकरांचं पहिलं टार्गेट चंद्रकांत पाटील ठरलेत का ?अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटलांवरती टीका करताना धंगेकर म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी मोबाईलमधून व्हिडिओ रेकॉर्ड करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथं पोलीस स्टेशनला येऊन बोललं पाहिजे होत.

मोबाईलमध्ये व्हिडिओ करून फक्त दाखवून काही साध्य होत नाही. त्याच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत. त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे. गौतमी पाटील हिने जी चूक केली आहे, ते त्यांनी तिथे येऊन बोललं पाहिजे. ऑफिसमधून व्हिडिओ करून काही उपयोग नाही ते खोटं काम आहे.

चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे. तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो. तुझ्याकडे जे काही मोबाईल नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केलं पाहिजे. गुंड निलेश घायवळ आणि तो कितीवेळा बोलून दादांना निरोप दिला, याची पोलिसांनी माहिती घ्यावी. सत्ता आहे म्हणून पोलीस काहीही करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज ठरवलं तर घायवळ नेस्तनाबूत होईल. मात्र. ज्यांनी ही पिलावळ वाढवली त्यांचा तपास केला पाहिजे, अशी टीका धंगेकर यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT