Eknath Shinde, Nitesh Rane
Eknath Shinde, Nitesh Rane sarkarnama
विशेष

शिवसेना फोडायला मदत करू का : नितेश राणेंची शिंदेंकडे अशीही विचारणा

ज्ञानेश सावंत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात आज अर्धा तास चर्चा झाली. या दोघांच्या भेटीनंतर ठाकरे कुटुंबियांच्या विरोधात आणखी आक्रमक रणनीती तर ठरली नाही ना, अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली.

ठाकरे आणि त्यांच्याभोवतीच्या नेत्यांना गळाला लावण्याच्या शिंदे यांच्या मोहिमेला राणे यांच्याकडूनही रसद पुरवली जाण्याची शक्यताही या भेटीनंतर व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेला धक्क्यांवर धक्के देण्याच्या शिंदे यांच्या खेळ्यांचे कौतुक करीत या मोहिमेत काही हातभार लावू शकतो का, अशी मिश्किल विचारणा करीत राणे यांनी शिंदेंकडे केली. शिंदे यांनी या मदतीचे स्वागतच असल्याचे या वेळी सांगितले.

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राणे हे दुपारी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हेही तिथे पोचले. तेव्हा शिंदे-राणे यांनी धर्माधिकारी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर तेथील डॉक्टरांसोबत चर्चा केली. त्यानंतर या दोघांत जवळपास अर्धातास बोलणे झाले. शिंदे आणि राणे यांच्यातील भेट 'योगायोग' असली; तरीही शिवसेनेला 'टार्गेट' करण्याच्या मुद्दयावरच चर्चा घडल्याचे बोलण्यात येत आहे.

आगामी मंत्रीमंडळ विस्तारापासून त्याचा मुहूर्त संभाव्य मंत्रीमंडळ या बाबींवरही दोघांत चर्चा झाली. शिवसेनेत बंडखोरीपासून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यापलीकडे जाऊन आता शिवसेनेचा ताबा घेण्याच्या जोरदार हालचाली शिंदे गटाकडून करण्यात येत आहेत. या दोघांमधील संघर्षात ठाकरे यांच्यावर तुटून पडण्याची एकही संधी राणे पित्रापूत्र सोडत नाहीत. शिंदे यांच्या माध्यमातून ठाकरे नामोहरम होत असल्याने राणेंच्या गोटातूनही ठाकरेंच्या दिशेने रोज नवनवे बाण सोडले जात आहेत. यात आता थेट शिवसेना फुटीसाठी काही मदत करू का, अशी विचारणाच राणे यांनी केल्याने आता त्याचे पडसाद कोकणात कसे उमटणार, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT