CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News
CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News Sarkarnama
विशेष

फक्त शिवसेनेचा प्रचार करायचा : मुख्यमंत्र्यांच्या अटीवर संभाजीराजेंनी डोके खाजवले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणूक घडामोडींनी सध्या वेग घेतला आहे. अशातच राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा केलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje Chhtrapati) यांनी आज सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची `वर्षा` या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल अर्धा तास खलबत झाली. राज्यसभेची सहावी जागा शिवसेना (Shivsena) लढविणार असल्याने या भेटीला महत्व प्राप्त झालं होतं.

दरम्यान, या भेटीतील चर्चेचा तपशील आता माध्यमांच्या हाती लागला असून या चर्चेदरम्यान शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींपुढे राज्यसभेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला. मात्र संभाजीराजे यांनी माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिला.

त्यावर ठाकरे यांनी संभाजीराजेंना ४ अटी घातल्या. मात्र या अटींचा तपशील ऐकताच ते नाराज झाले असून त्यांनी या अटींमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजे यांना विचार करून कळवतो असे सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहेत संभाजीराजे छत्रपतींपुढील अटी?

  • संभाजीराजे छत्रपती शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तरी संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांसोबतच असणार.

  • संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णायावर सोबत राहणार. राज्यसभेतील विधेयकं आणि इतर राजकीय निर्णयांशी संंबंधित संभाजीराजेंची भूमिका ही शिवसेनेची जी अधिकृत भूमिका असेल तिच असणार.

  • अगामी सर्व निवडणुकांमध्ये संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचा प्रचार करणार.

  • शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राज्यसभेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती असले तरी ते शिवसेनेचे २३ वे खासदार म्हणूनच कार्यरत रहाणार.

राज्यसभेच्या ६ पैकी ५ जागांवर भाजपचे २, शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येवू शकतो. त्यामुळे उर्वरित सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून सहावी जागा शिवसेना लढविणार असल्याचे मंत्री अनिल परब (Anil parab) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT