Ramdas Kadam | Balasaheb Thackeray Sarkarnama
विशेष

दिग्गजांचे पत्ते कापले अन् बाळासाहेब ठाकरेंनी रामदास कदमांना पहिल्यांदा मंत्री केले...

सरकारनामा ब्युरो

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची काल पक्षातून हकालपट्टी केली. पण त्याआधीच त्यांनी नेतेपदाचा राजीनामा देत आपणच शिवसेना (Shivsena) सोडत असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत कदम यांना पुन्हा नेतेपद दिलं. पण हकालपट्टीमुळे कदम चांगलेच निराश झाले. शिवसेनेसाठी आम्ही ५२ वर्ष सर्वकाही केले, असे सांगताना कदम यांना अश्रू अनावर झाले होते. (Ramdas Kadam Latest News)

त्यावेळी लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेमुळे देशभरात हिंदुत्वाची लाट होती. याच लाटेवर स्वार झाल्याने शिवसेनेसाठी महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता. त्यामुळे बाळासाहेबांनी कोणत्याही मतदारसंघात उभं केले तरी तो निवडून येणारच एवढी चलती शिवसेनेची होती. याच लाटेत रामदास कदमांना बाळासाहेब यांनी खेडला पाठवलं आणि तिथून विधानसभेच तिकीट दिलं. रामदास कदम १९९० मध्ये खेडमधून निवडून आले.

शिवसेनेसाठी रस्त्यावर लढणारा नेता म्हणून रामदास कदम (Ramdas Kadam) एकप्रकारे बाळासाहेब ठाकरे यांचे निकटच्या वर्तुळातील नेते बनले होते. १९९० साली शिवसेनेची सत्ता येणे अगदी थोडक्यात हुकले होते. पण १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या ताब्यात महाराष्ट्राची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मंत्रिमंडळ रचनेचे काम सुरू केले. या रचनेत त्यांनी दत्ताजी साळवींपासून भल्याभल्यांचे पत्ते कापले होते. रामदास कदम यांचं देखील नाव पत्ता कापलेल्या यादीत होते. (Ramdas Kadam Latest News)

मंत्रिपदाऐवजी कदम यांची एखाद्या महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लावावी, असा विचार करून पेट्रोलियम महामंडळाचं अध्यक्ष म्हणून रामदास कदम यांचं नावही घोषित करण्यात आले. पण बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र रामदार कदम यांना कोकणात ताकद देण्यासाठी मंत्रिपदाचा विचार सुरु केला. त्यातून भल्या भल्यांना मागे सारून कदमांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यांच्याकडे अन्न आणि नागरीपुरवठा खात्याच राज्यमंत्रीपद देण्यात आलं. पुढे मनोहर जोशी जावून राणे आले पण मुख्यमंत्री बदलल्यानंतरही कदमांचे मंत्रीपद कायम होते.

यातून कदम शिवसेनेतील पहिल्या फळीतील नेते झाले. नेतेपद निर्माण झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना अधिकृत नेतेपद दिले. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी लागली. २००९ मध्ये खेडाचा मतदारसंघ भाजपकडून मागून घेवून कदम यांना दिला. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. पण बाळासाहेबांनी कदमांना लगेच विधान परिषदेवर पाठवले. पुढे उद्धव ठाकरे यांनी देखील कदम यांना २०१४ मध्ये मंत्रीपद दिले. २०१९ मध्ये मुलगा योगेश कदम यांना विधानसभेचे तिकीट दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT