Sudhir Mungantiwar-Ajit Pawar
Sudhir Mungantiwar-Ajit Pawar sarkarnama
विशेष

सुधीर मुनगंटीवारांची अजितदादांना पुन्हा ऑफर; ‘ते माझ्या कानात येऊन सांगा...’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या भाषणात बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) ‘एकनाथराव (Eknath Shinde) तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असतं तर तुम्ही मुख्यमंत्रीपदी बसवलं असतं’ असं विधान केले. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ‘एकनाथरावांनी तुमच्या कानात सांगितलं नाही, ही त्यांची चूक झाली. पण, आयुष्यात तुम्हाला कधी तसं (मुख्यमंत्री व्हावं) वाटेल, तेव्हा आमच्या कानात येऊन निश्चितपणे सांगा,’ असे सांगून अजितदादांना पुन्हा ऑफर दिली. (Sudhir Mungantiwar's offer to Ajit Pawar again)

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली. त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाची भाषणे चिमटे आणि टोमण्यांनी गाजली. विशेषतः अजित पवार यांनी भाजप नेत्यांना चांगलेच चिमटे घेतले. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला.

माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, एकनाथराव शिंदे आपण एकत्रपणे काम केलेले आहे. तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असतं की, अजित पवार जरा उद्धवजींंना सांगा की आता मला जरा द्या. अडीच वर्षे झालीत. तर त्यांना सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं. काय प्रॉब्लेमच आला नसता. पवार एवढ्यावरचं थांबले नाही तर त्यांनी आदित्य ठाकरे यांनाही ‘आदित्य काही प्रॉब्लेम आला नसता ना’ अशी विचारणा करत अडचणीत आणले. याशिवाय अजित पवारांनी सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेचे अध्यक्ष करा, असे मी सूचविले होते, असे सांगितले.

त्यानंतर बोलायला उठलेले माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांनाही चिमटे घेतले. या वेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत अप्रत्यक्ष भाष्य केले. ते म्हणाले की अजितदादांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी माझं नाव सुचवलं. मी त्यांचा आभारी आहे. नार्वेकर, तुम्ही अध्यक्षपदावर बसताना त्यात माझीही त्याग आहे, हे विसरू नका, असे सुचविले. त्यानंतर मुनगंटीवार अजित पवारांकडे वळले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तुमच्या कानात सांगतिलं असतं, तर तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगून शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसविले असते. त्यांनी तुम्हाला सांगितले नाही. ही त्यांची चूक झाली. पण, तुम्हाला आयुष्यात कधी असं वाटेल, तेव्हा आमच्या कानात येऊन निश्चितपणे सांगा. एवढं मी तुम्हाला सांगतोय.

जयंतरावांच्या कानात सांगू नका...

या आगोदर अजित पवारांनी एकदा सांगितले होतं. पण त्यावेळी ते जमलं नाही. ता. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी बरोबर का जयंतराव. पण, जयंतरावांच्या कानात मात्र कधीच सांगू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यांच्या कानात सांगितलं की मग धोका आहे, असेही मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना सुचविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT