Ajit Pawar-Jayant Patil  Sarkarnama
विशेष

Jayant Patil On Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री होण्याचा प्रश्न आजतरी दिसत नाही; जयंत पाटलांचे भाष्य

NCP News : एकनाथ शिंदे यांच्याबरेाबर गेलेल्या आमदारांच्या मनात खंत, अस्वस्थता, नाराजी आहे. काहींचे वेगळे फायदे झाले असतील, ते गप्प आहेत. ज्यांना काहीच मिळाले नाही, ते आज प्रचंड अस्वस्थ आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Beed Political News: अजित पवार हे आज उपमुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. अजितदादा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्न अजून उद्‌भवलेला दिसत नाही. तसा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यावर बोलणे योग्य आहे, त्यामुळे त्यावर आज बोलण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले. (There is no question of Ajit Dada becoming CM even today: Jayant Patil)

ज्येष्ठ नेते शरद पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत जयंत पाटीलही सहभागी झाले आहेत. त्यावेळी पाटील यांना ‘अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. ते जर मुख्यमंत्री झाले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे,’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी वरील विधान केले.

पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार हे अनेकांना भेटत असतात. लोकं गैरसमज करतात. हे कसे भेटले, ते कसे भेटले. एखादी व्यक्ती भेटून गेल्यानंतर शरद पवार त्याच्यामागे गेले नाहीत ना. जी व्यक्ती अथवा नेता भेटायला येतो, त्याच्याशी शरद पवार हे आदरानेच वागतात. राज्यातील सर्व नेत्यांना त्याचा अनुभव आहे. शरद पवार कोणाला भेटले, किती वेळ भेटले आणि कशासाठी भेटले याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.

शरद पवार यांच्या आशीर्वादशिवाय काही होणार नाही, याची खात्री पटल्यामुळेच ते आम्हाला आशीर्वाद द्या म्हणून बॅनर लावत असावेत. पवारांचा आशीर्वादच सर्वकाही आहे, त्यांचा आशीर्वाद मागण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याच्याआड येणं मलाही योग्य वाटत नाही. साहेबांचा आशीर्वाद मागण्याची गरज आहे, याच्यात आपण सर्वांनी ओळखून घ्यायला पाहिजे, असेही पाटील यांनी नमूद केले.

मी शरद पवार अध्यक्ष असलेल्या मूळ राष्ट्रवादीचा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. रोज उठून बोलणं हा माझा स्वभाव नाही. मी माझी भूमिका अगोदरच स्पष्ट केलेली आहे. आता मी पवार यांच्या सभेला बीडमध्ये आलो आहे ना. वारंवार तेच तेच प्रश्न चर्चिले जात आहेत. महागाई, मणिपूरची घटना यासारख्या प्रश्नांना महत्व नाही. पण जयंत पाटील उद्या कुठे जाणार याचे महत्व वाढलेले आहे. सगळे महत्वाचे प्रश्न बाजूला सारण्याचे काम कोणी करतंय का, याचा शोध घेतला पाहिजे. मी आहे, त्याच ठिकाणी आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याबरेाबर गेलेल्या आमदारांच्या मनात खंत, अस्वस्थता, नाराजी आहे. काहींचे वेगळे फायदे झाले असतील, ते गप्प आहेत. ज्यांना काहीच मिळाले नाही, ते प्रचंड चिडीने, रागाने आज अस्वस्थ आहेत. उद्वव ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदारांच्या मनात ती अस्वस्था जास्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT