Vijay Shivtare
Vijay Shivtare  Sarkarnama
विशेष

त्या दिवशी सकाळी सातला पवारसाहेबांचा फोन आला अन्‌ म्हणाले, ‘एवढा मोठा प्रकल्प...’

सरकारनामा ब्यूरो

सासवड (जि. पुणे) : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापर्यंत जाऊन विमानतळाचा प्रकल्प आम्ही मंजूर करून आणला. ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जाहीर झालं, त्या दिवशी सकाळी सात वाजता मला शरद पवारसाहेबांचा (Sharad Pawar) फोन आला. माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले की ‘विमानतळासाठी मी तुम्हाला मदत करेन. जाता जाता एवढं म्हणाले की, एवढा मोठा प्रकल्प आणला. पण मला पत्ताही लागू दिला नाही,’ असे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सांगितले. (Vijay Shivtare criticizes Sharad Pawar, Uddhav Thackeray on the pending airport issue)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सासवड आज (ता. २ ऑगस्ट) जाहीर सभा झाला. त्या सभेत माजी मंत्री शिवतारे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पवारांवर शरसंधान साधले. विजय शिवतारे म्हणाले की, विमान प्राधिकारणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेाते. पाहिल्या सात गावांत हे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासाठी आंतराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण, डीजीसीएस, राज्य आणि केंद्र सरकारडून सर्व परवानाग्या मिळाल्या होत्या. सर्व्हेसाठी ५७ कोटी रुपयांचा खर्च झाला. एक गाव विरोधात होतं. पारगाव वगळून सहासाडे हजार एकरऐवजी तीन हजार एकर क्षेत्रावर लोकांना विश्वासात घेऊन विमानतळाचे काम आपण हाती घेऊ, अशी माझा मागणी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दहा-दहा वेळा पत्रं दिली. पण, एकही भेट मिळू शकली नाही.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विमानतळाप्रश्नी जाऊन भेटलो. म्हटलं साहेब एक काम करा. विमानतळाच्या मंजुरी झाल्या आहेत. समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादनास दोन वर्षे विरोध होता. पण, एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रमाणे जमिनीचे दर जाहीर केले, तसे शेतकऱ्यांनी स्वतःहून येऊन समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिल्या आणि त्यानंतर ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग पूर्ण झाला. त्यामुळे माझं म्हणणं एकच होतं की पारगाव वगळा आणि जमिनीचे भाव जाहीर करा. सुमारे सहा ते सात महिन्यांचा कालावधी आम्हाला द्या, त्यानंतरही शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या नाही तर पाहिजे त्या ठिकाणी विमातनळ घेऊन जावा. पण, पाप केलं आणि मी शरद पवारांना जाऊन भेटलो. मी म्हटलं साहेब, पन्नास वर्षांत तुम्ही आम्हा पुरंदरकरांना काहीही दिलं नाही. त्या पन्नास वर्षांत बारामतीपेक्षा दोन मते अधिकची या पुरंदरने पवारांना दिली आहेत. सासवडला पाणी दिलं म्हणतात. पण, शिवसेनेने आंदोलन केले आणि लोकसभेची निवडणूक होती म्हणून सासवडला पाणी दिलं, असा दावाही शिवतारे यांनी केला.

विमानतळासाठी नवी पाच गावांतील जागा दाखवली. त्याला कसलीही परवानगी नव्हती, शेतकरी जमीन देण्यास तयार नव्हते. नुसतं नावालाच दाखवलं ते. त्या ठिकाणी अर्ध विमानतळ, पुरंदरला लॅडिंग आणि टर्मिनन्स बारामतीत सुप्याजवळ दाखवलं. तुम्ही ५० वर्षांत काही आणलं नाही. कमीत कमी आम्ही आणलेलं तरी आमच्या पुढच्या पिढीतील तोंडचा घास हिरावू नका, असे आवाहनही विजय शिवतारे यांनी या वेळी बोलताना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT