Aditya-Deepak Kesarkar
Aditya-Deepak Kesarkar sarkarnama
विशेष

रोज डोस देणाऱ्या केसरकर आणि शंभूराज यांना आदित्य काय उत्तर देणार?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नाशिक आणि औरंगाबादच्या दौर्‍याला शिवसैनिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिल्यानंतर आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्यात शिव संवाद यात्रा काढणार आहेत. येत्या सोमवारपासून १ ते २ ऑगस्ट असा दौरा असणार आहे.


सिंधुदुर्गातील सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्या मतदारसंघातून शिवसंवाद यात्रेची सुरूवात होणार आहे. केसरकर हे शिवसेनेला रोज `मार्गदर्शन` करत असतात. तसेच शिवसेनेचे पर्यायाने ठाकरे यांचे कसे चुकले हे सांगत असतात. त्यामुळे आदित्य त्यांना काय उत्तर याची उत्सुकता असणार आहे. तसेच ते दोन खासदार सोडून गेलेल्या कोल्हापूरातही जाणार असल्याने तेथे ते काय फटाके फोडणार याकडेही अनेकांचे लक्ष असणार आहे.

पुण्यात हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते नाना भानगिरे हे शिंदे गटाचे पुण्यातील प्रमुख झाले आहेत. त्यांच्याही मतदारसंघात जाऊन आदित्य हे उत्तर देणार आहेत. माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण गावात जाऊन ठाकरे आव्हान देणार आहेत. शंभूराज हे देखील गेल्या काही दिवसांत ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. या आधी ठाकरे यांना भेटता येत नव्हते. वेळ घेऊनच त्यांना भेटावे लागत होते. पण आता बंडानंतर ठाकरे लोकांत मिसळू लागल्याचा टोला देसाई यांनी लगावला होता. त्यावर आदित्य यांना प्रत्युत्तर द्यावे लागणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेच्या टप्प्याचे वेळापत्रक

दिवस पहिला, सोमवार १ ऑगस्ट

- सकाळी ११:३० वाजता कुडाळ येथे शिवसंवाद यात्रा
- दुपारी १२:३० वाजता सावंतवाडी येथे मेळावा
- सायंकाळी ०६:३० वाजता कोल्हापूर शहर येथे मेळावा

मंगळवार २ ऑगस्ट

- सकाळी १० वाजता कोल्हापूर येथून शिरोळकडे रवाना होणार
- दुपारी १२ वाजता शिरोळ येथे शिव संवाद यात्रा
- दुपारी ०३:१५ वाजता पाटण येथे शिव संवाद
- सायंकाळी ०६:४५ कात्रज येथे शिव संवाद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT