पंढरपूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मोठ्यातील मोठा नेत्यासुद्धा लवकरच पक्षाला दणका देणार आहे. वेळ आल्यावर तेही घडणार आहे. हे सर्व ठरलेलं आहे. पंढरपुरात रात्री झालेल्या बैठकीलाही ते उपस्थित होते. त्याच्या अगोदर आले होते होते, असा गौप्यस्फोट आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांनी केला.(Who is the big NCP leader who attended the meeting of Fadnavis in Pandharpur?)
पंढरपुरात कार्तिकी वारीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर आमदार पाटील हे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक मोठा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पंढरपुरातील बैठकीला ते उपस्थित होते, असा दावाही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या मनस्थितीत असलेल्या त्या नेत्याच्या हाती आता काही राहिले नाही, सर्व काही पोरांनीच केले आहे, असे सूचक विधानही शहाजीबापू पाटील यांनी केल आहे. दरम्यान, शहाजीबापूंच्या त्या दाव्यानंतर सोलापूर राष्ट्रवादीतील तो नेता कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना शहाजी पाटील यांनी मोठा गौप्यस्फोटही केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नेते फुटले आहेत; त्यांच्या प्रवेशाचा फक्त मुहूर्त बाकी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार पाटील म्हणाले की विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांनी उद्याच्या नागपूर अधिवेशनानंतर राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडणार आहे, असे जे भाकीत केले आहे. ते विधान अत्यंत विनोदी असे आहे. त्याला कोणताही पुरावा नाही. राज्यातील १७० आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.