Jyoti Mete-Devendra Fadnavis
Jyoti Mete-Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Jyoti Mete-Fadnavis : ज्योती मेटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? फडणवीसांनी दिले हे उत्तर....

सरकारनामा ब्यूरो

बीड : ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना आमदार (MLA) होऊन मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमची सगळी चर्चा त्यांच्याशी झालेली आहे. योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात. एकावेळी सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात,’ असे उत्तर दिले. त्यामुळे ज्योती मेटे यांच्या राजकीय इनिंगकडे बीडसह संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. (Will Jyoti Mete get a place in the cabinet? Fadnavis gave this answer…)

दिवंगत विनायकराव मेटे यांच्या पुढाकाराने बीड शहरात दरवर्षी ३१ डिसेंबरला व्यसनमुक्ती जनजागृती फेरी व संगीत रजनी घेऊन गोड दुधाचे वाटप केले जाते. यंदा डॉ. ज्योती मेटे यांच्या पुढाकाराने अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता. ३१ डिसेंबर) व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढण्यात आला. त्याच्या समारोपाला उपमुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्यावेळी ज्योती मेटे यांची आमदारकी आणि मंत्रीपदाबाबत भाष्य केले.

दरम्यान, शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी सावंत यांनी विनायक मेटे यांच्या मागे ज्योती मेटे यांना स्थान दिले पाहिजे. सत्तेत सहभागी करून घेतले पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यावर ज्योती मेटे यांनी ती शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी घेतलेली ती भूमिका हेाती. मी तर म्हणेन शिवसंग्राम हे आमचे विस्तारीत कुटुंब आहे. शिवसंग्राम पक्षाने वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेला अनुसरूनच त्यांनी ही भूमिका मांडली आहे. त्याबाबत सध्या मी काही भाष्य करणार नाही. पण, योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात आणि तो नक्की होईल, असे उत्तर ज्योती मेटे यांनी दिले. त्यामुळे फडणवीस आणि ज्योती मेटे यांच्या बोलण्यात एकच ओळ आली, त्याचीही चर्चा रंगली आहे.

दरम्यान, कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, दिवंगत विनायकराव मेटे यांनी व्यसनमुक्त अभियानाची सुरुवात करुन मुख्यमंत्री असताना मला बोलविले. मात्र, त्यावेळी मला येता आले नाही. आज आलो; परंतु दुर्दैवाने विनायकराव मेटे आपल्यात नाहीत. मात्र, विनायकराव मेटे यांनी हाती घेतलेली चळवळ डॉ. ज्योती मेटे पुढे चालवत आहेत. या चळवळीला सरकार म्हणून राज्यभर बळ दिले जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT