Jitendra Awhad, Eknath Shinde News sarkarnama
विश्लेषण

आव्हाडांचा गेम कोण करतंय? मुख्यमंत्र्यांशी जवळीक कुणाला खुपतेय!

Eknath Shinde, Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रावादी आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde, Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना शनिवारी विवियाना मॉल प्रेक्षक मारहाणी प्रकरणी जामीन मिळाला. तोच त्यांच्यावर पुन्हा आज (ता. १४) थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील आहेत. ठाण्यामध्ये दोन्ही नेत्यांचे अनेक वर्षांपासून चांगले सबंध आहेत. त्याचा प्रयत्न रविवारी झालेल्या कार्यक्रमात आला. रविवारी ठाण्यातील कळवा पुलाचे उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर आले होते. या सोहळ्यात शिंदे-आव्हाडांनी एकमेकांना चांगल्याच कोपरखळ्या लगावल्या.

या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. आव्हाड बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना टपली लगावली होती. दरम्यानच्या काळात आव्हाड यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच आव्हाड यांना अटक केलेल्या पोलिस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. कारण आव्हाड यांना अटक करांना मला वरिष्टांचे आदेश आहेत, त्यामुळे अटक करावी लागले, असे पोलिस अधिकारी आपल्याला म्हणाले होते, असा दावा आव्हाड यांना माध्यमांशी बोलताना केला होता.

मात्र, ज्या कार्यक्रमात आव्हाड आणि शिंदे यांची जुगलबंदी रंगली होती. त्याच कार्यक्रमानंतर आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे शिंदे आणि आव्हाडांमधील मैत्री नेमकी कोणाला खुपतेय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच रविवारी रात्री आव्हाड यांनी ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये आव्हाड म्हणाले होते, 'चाणक्य नाही शकुनि मामा…शिंदे साहेब जपून रहा' असा सल्ला आव्हाड यांनी दिला होता. मात्र, शिंदे यांच्या ऐवजी आव्हाड यांनाच काळजी घेण्याची गरज आहे.

या ट्वीटनंतर सकाळी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलेला शकुनि मामा कोण? याचीच चर्चा आज माध्यमांवर आणि सोशल मीडियावर जास्त रंगली आहे. शिंदे यांना दिलेल्या सल्यानंतर आव्हाड यांच्यावर थेट विनयभंगासारखा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आता आव्हाडांचा गेम कोण करतंय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT