after surajpur collector now sdm slpas youth in chattaisgarh
after surajpur collector now sdm slpas youth in chattaisgarh  
विश्लेषण

जिल्हाधिकाऱ्यांनंतर आता उपजिल्हाधिकाऱ्यांनी गाजवला असाही पराक्रम...

वृत्तसंस्था

रायपूर : देशभरात कोरोनाची (Covid19) दुसरी लाट आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध (Lockdown) लागू आहेत. संचारबंदी असताना औषधे घेण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणाला जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता याच जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांनी (SDM) एका तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

आता सूजरपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी प्रकाशसिंह राजपूत यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राजपूत हे लॉकडाउनची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांनी रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यास सुरवात केली. त्यावेळी तिथून एक युवक जात होती. त्यांनी त्या एका युवकाला जोरदार थप्पड लगावली. त्यावेळी हा युवक हात जोडून उभा असल्याचे दिसत आहे. त्यालाही उठाबशा काढण्यास राजूपत यांनी सांगितले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सरकारी अधिकारीच कायदा हातात घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

हा व्हिडीओ चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही जर याच्याशी सहमत असाल तर लाईक करा. तुम्हाला वाटत असेल निष्पाप नागरिकांना उपजिल्हाधिकारी प्रकाशसिंह राजपूत यांच्यासारख्या अन्यायी अधिकाऱ्यांना पुन्हा मारण्याचा अधिकार असावा, असे वाटत असेल तर रिट्विट करा. 

याआधी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रताप 
याआधी सूरजपूर जिल्ह्यात २२ मे रोजी जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी एका तरुणाला कानाखाली मारली होती. जिल्हाधिकारी शर्मा हे रस्त्यावर उतरुन लॉकडाउनची पाहणी करीत होते. त्यावेळी औषधे घेण्यासाठी एक तरुण दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी जिल्हाधिकारी शर्मा आणि पोलिसांनी त्याला अडवले. त्याला बाहेर पडण्याचे कारण विचारण्यात आले. त्यावेळी त्याने औषधे घेण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले होते. 

त्या तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची कागदपत्रे आणि मोबाईलवरील इतर कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या कानाखाली लगावून त्याचा मोबाईळ रस्त्यावर आपटला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवावा, असा आदेशही पोलिसांना दिला होता. यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. जिल्हाधिकारीच कायदा हातात घेऊ लागले तर इतरांनी काय करायचे, असा सवाल नेटिझन सोशल मीडियावर विचारू लागले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT