Vidhnsabha Election : काँग्रेसमध्ये २०१७ मध्ये रेवंथ रेड्डी यांनी प्रवेश केला. त्यावेळेसपासून त्यांनी पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम केले. २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष केले. त्यावेळी तेलंगणातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या निवडीवरून संताप, नाराजी व्यक्त केली होती, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यांच्या पाठीशी पक्षश्रेष्ठी खंबीरपणे उभी राहिली त्याचा फायदा तेलंगणात झाला अन काँग्रेसची सत्ता आली. तर राजस्थानात माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या आडमुठेपणामुळे तर मध्यप्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ व दिग्विजय सिंह यांच्या वादामुळे सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
यामधून काँग्रेसने बोध घेत अशोक गेहलोत, कमलनाथ या जुन्या जाणत्या मंडळींना पक्ष संघटनेपासून दूर ठेवावे. येत्या काळात काँग्रेसने नव्या दमाचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली तरच बदल घडेल.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ७७ वर्षीय कमलनाथ (Kamalnath) यांच्या समोर आता राजकारणात दुसरा पर्याय उरला नाही. मध्य प्रदेशात जर काँग्रेसची सत्ता आली असती तर त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार होती. मात्र, या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्यासकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. कमलनाथ व माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांच्या दोन गटात नेहमीच वाद पाहण्यास मिळतात.
या वादातूनच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने वातावरण असताना त्याचे विजयात रूपांतर करणे या दोघांना जमले नाही. त्यामुळेच येत्या काळात कमलनाथ यांच्या समोर मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद सोडून द्यावे लागणार, याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी दिसत नाही.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट या दोघांचा गेल्या पाच वर्षातील अधिक काळ वादातच गेला. दुसरीकडे पायलट यांनी जोतिरादित्य शिंदेप्रमाणे बंड ही केले होते. मात्र, राहुल गांधी यांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला होता.
या दोघांच्या वादात विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा झाला व सत्ता मिळाली. त्यामुळे आगामी काळात आता अशोक गेहलोत यांच्या हातात फारसे काही राहील व काँग्रेस त्यांच्यावर विश्वास दाखवेल असे वाटत नाही. त्यामुळे गेहलोत यांच्यापुढे आता सन्मानानाने राजकारणातून निवृत्त होण्याशिवाय फारसे त्यांच्या हाती काही राहिले आहे असे वाटत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या ७० वर्षांच्या आहेत. त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शेवटची संधी असणार आहे. भाजपमध्ये ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असल्यास पदे दिलाय जात नाहीत. त्यामुळे त्यांना याच वेळेस मुख्यमंत्री होता येणार आहे. त्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु ठेवले आहेत. त्यांचे चिरंजीव दुष्यंत हे खासदार म्हणून चांगले काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळेस त्यांना जर मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही तर त्यांना सन्मानानाने निवृत्त होण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही. त्यामुळे सर्वांचे त्यांच्या आगामी काळात काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे.
तेलंगणा विधानसभेत गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएसचा सफाया करीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या के. चंद्रशेखर राव यांना पायउतार व्हावे लागले. ६९ वर्षाच्या चंद्रशेखर राव यांना आता सत्तेत येण्यासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत त्यांचे वय ७४ वर्ष होईल. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत ते मुलाला संधी देतील, असे वाटते.
या निवडणुकीपासूनच त्याने चिरंजीव केटीआर याला प्रमोट करण्यास सुरुवात केली होती. मात्र, या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना राजकारणातून निवृत्ती घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.