विश्लेषण

कर्जमाफी भगवी कफणी घालणाऱ्या  जमली जॅकेट घालणाऱ्यांना का नाही ? 

ब्रह्मा चट्टे: सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास भगवी कफणी घालणाऱ्याला जमला मग जॅकेट घालणारांना का जमत नाही ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी सरकारला केला. 

जीएसटी विधयेकावरील चर्चेवर पवार बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारविरोधात जोरदार टोलेबाजी केली. जीएसटीचे विधयेक मंजूर झाल्यानंतर तुम्ही जे जे आश्वासन दिले ते पूर्ण करा. कुणाच्या ही निधीवर परिणाम होवू देवू नका असे आवाहन करताना पवार म्हणाले, की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंबंधी तुमचे मित्र पक्ष म्हणतात "ते योगी सरकार हे निरोपयोगी सरकार' मग तुम्ही ठरवा काय ते ? 

आमच्याकडून चूक झाली म्हणूनच आम्ही विरोधी बाकावर बसलो. विरोधकांना निर्लज्ज म्हणण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांची मजल गेली होती. तशी तुमची जीभ घसरू देवू नका. एक चुकीचा शब्द बोलल्यावर काय किंमत मोजावी लागते हे मला चांगले माहितीय. त्यामुळे तुम्ही इतक्‍या लवकर जीभ घसरू देवू नका," असा सल्लाही अजित पवार यांनी मंत्र्यांना दिला. 

सुधीरभाऊ, तुम्ही कर्जमाफीसाठी जो आकडा काढला आहे. तो आम्हाला वाटलं कर्जमाफीसाठी काढला आहे. पण, तुम्ही तर याबाबत काहीच करायला तयार नाही. आम्ही संघर्ष यात्रा काढल्यानंतर शिवसेनेला शिवसंपर्क यात्रा काढावी लागली, भाजपला संवाद यात्रा काढावी लागली तर स्वाभिमानीला आत्मक्‍लेश करावा लागला. 
काहीही असो शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने केली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT