Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Ajit Pawar : अजितदादांचा सल्ला पक्षातीलच नेते मंडळींना मानवणार का? 'त्या' आदेशावर कधी होणार कारवाई?

Ajit Pawar advice to party leaders News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीत सदस्य नोंदणी करताना मरगळ आल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच बैठकीदरम्यान अजितदादांनी सर्व नेतेमंडळीची कानउघडणी करीत लवकरच निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्याची ताकीद दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : एकीकडे भाजपने सभासद नोंदणीत मोठी आघाडी घेतली आहे. भाजप हा जगातील मोठा पक्ष ठरला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील सभासद नोंदणीवर गेल्या काही दिवसापासून लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षातील मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांना सभासद नोंदणीचे टार्गेटही दिले आहे. त्यानुसार कामही सुरु झाले होते. मात्र, बरेच दिवस उलटूनही निर्धारित लक्ष पूर्ण झालेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीत सदस्य नोंदणी करताना मरगळ आल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच बैठकीदरम्यान अजितदादांनी सर्व नेतेमंडळीची कानउघडणी करीत लवकरच निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्याची ताकीद दिली आहे. केवळ पक्षामुळेच आमदारकी खासदारकी मंत्रिपद मिळत असतात, त्यामुळे पक्ष वाढीकडे देखील प्रामुख्याने लक्ष द्या, असा सज्जड दमच बैठकीत भरला आहे.

वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर मात्र सर्व कार्यकर्ते अंग झटकून कामाला लागल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील राष्ट्रीय अधिवेशनावेळी येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले होते.

दुसरीकडे पक्षवाढीसाठी महत्वपूर्ण असलेल्या सभासद नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानुसार पक्षातील मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांना सभासद नोंदणीचे टार्गेटही देण्यात आले होते. मात्र, सभासद नोंदणी करताना नेटमंडळीत नाराजीचा सूर दिसून येत होता. त्यामुळे अपेक्षीत नोंदणी गेल्या काही दिवसात झाली नसल्याने संघटनेत काहीशी मरगळ सातत्याने जाणवत होती. त्यामुळेच अजित पवारांनी (Ajit Pawar) हा नाराजीचा सूर घालवण्यासाठी नेतेमंडळींची कानउघाडणी केली आहे.

अजित पवारांनी नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत येत्या 8 दिवसांत नवीन सभासद पक्षाला जोडून घेण्यासाठी डोळ्यासमोर एक आकडा निश्चित करून सदर नोंदणी पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना दिल्या आहेत. त्यांनी कामाच्या शिस्तीबाबत, कारभारातील ढिलाई, आणि जनतेशी थेट संवाद न साधण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. केवळ पक्षामुळेच आमदारकी खासदारकी मंत्रिपद मिळत असते, त्यामुळे पक्ष वाढीकडे देखील प्रामुख्याने लक्ष द्या आणि जास्तीत जास्त नवीन सभासद पक्षाला जोडून घ्या, असा दमच अजितदादांनी भरला आहे.

अजितदादांची ओळख ही नेहमीच कार्यक्षमतेवर भर देणारे आणि वेळेचे कठोर पालन करणारे नेते म्हणून राहिली आहे. त्यामुळे त्यांचे रागावणं फारसे आश्चर्यकारक नाही. नेहमीच त्यांचा नेतेमंडळींना त्यांना समजेल अशा पद्धतीने चिमटे काढत काम करून घेण्याची त्यांच्या कामाची हातोटी आहे.

या सर्व मुद्द्यांवरून स्पष्ट होते की, अजित पवार पक्षातील शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर भर देत आहेत. त्यांची ही भूमिका पक्षाच्या एकसंधतेसाठी आणि जनतेच्या हितासाठी येत्या काळात महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे एकीकडे अजितदादानी कानउघडणी करीत पक्षाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येत्या काळात तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळी सभासद नोंदणीच्या कामाला लागणार का? याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT