Ajit Pawar  Sarkarnama
विश्लेषण

Ajit Pawar News : स्टॅम्प’वर लिहून द्यायची अजित पवारांची तयारी; तरी बंडखोरीची चर्चा थांबेना; काय आहे कारण ?

Chetan Zadpe

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायऊतार होण्याची इच्छा व्यक्त करत, एकप्रकारे आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. पवारांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली.

शरद पवार पायउतार झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) ही दोन नावे सर्वात पुढे आहेत. अजित पवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी सर्वात पुढे असले तरी, दुसरीकडे त्यांचा भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चा थांबताना दिसत नाही. उलटपक्षी या चर्चा वारंवार घडून येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायऊतार होण्याची इच्छा व्यक्त करत, एकप्रकारे आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. पवारांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. शरद पवार पायउतार झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्ष नेते अजित पवार ही दोन नावे सर्वात पुढे आहेत. अजित पवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी सर्वात पुढे असले तरी, दुसरीकडे त्यांचा भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चा थांबताना दिसत नाही. उलटपक्षी या चर्चा वारंवार घडून येत आहेत.

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीबाबत खुद्द शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून भाष्य केले आहे. 'अजितचं भाजपसोबत सत्ता स्थापन करणे, आमच्यासाठी धक्कादायक होतं, असे शरद पवार आपल्या पुस्तकात म्हणाले आहेत. या पुस्तकाची आणि विशेषत: पुस्तकातील या प्रसंगाची राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सध्या विशेष चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व आमदार महेश शिंदे यांनी म्हंटले आहे की, 'अजित पवार हे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले असते. मात्र, शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने सध्या सारे शांत आहेत. मात्र, काहीही झाले तरी थोड्या दिवसांत या गोष्टी होणारच आहेत. अजित पवार हे त्यांच्यासोबत राहणार नाहीत,"

कायदेततज्ञ असीम सरोदे यांनी याबाबत अप्रत्यक्ष पण सूचकपणे टिपण्णी केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये सरोदे म्हणतात, "राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी १० मे च्या आधी नक्की होतील.११ मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की." अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केले आहे. ११ मे नंतर नवे राजकीय समीकरण अस्तित्वात येऊ शकते,अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे.

यामुळे अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार असे अनेकदा स्पष्टीकरण दिले असले तरी, त्यांचा भाजपसोबत जाऊन सत्तास्थापनेबाबतची चर्चा थांबताना दिसत नाही. वारंवार या चर्चा घडून येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सद्या घडणाऱ्या घडामोडीनंतर या चर्चांना आणखीनच उधाण येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT