विश्लेषण

कर्जमुक्तीबाबत सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी - अरुण गुजराथी

सरकारनामा ब्युरो

जळगाव : वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. त्यांच्या आशेवर आजही शेतकरी आहे. मात्र त्यांची वेळ कधी येईल हे माहीत नाही. त्यांची वेळ येईल तेव्हा येईल परंतु कर्जमुक्ती कशी करणार यांची श्‍वेतपत्रिका तरी सरकारने त्वरित काढावी असे आवाहन राज्याचे माजी अर्थमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी जळगाव येथे बोलताना केले. 

शेतकऱ्यांना कर्जासाठी रोख रक्कम उपलब्ध करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज जिल्हा बॅंकेला निवेदन देण्यात आले. यावेळी बोलतांना श्री. गुजराथी म्हणाले, की उत्तर प्रदेशात तिथल्या भाजप सरकारने एक लाख रुपये कर्ज माफ केले, त्याच धर्तीवर राज्यशासनाने कर्जमाफीसाठी सर्वच बॅंकांकडून एक लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागविली, मात्र त्यांच्याबाबत अद्यापही शासनाने निर्णय घेतलेला नाही, दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करू परंतु योग्य वेळ येईल तेव्हा. त्यांच्या या आश्‍वासनामुळे शेतकरी आजही कर्जमुक्तीच्या आशेवर आहे. मात्र निर्णय होत नाही. आता शेतीचा हंगाम आला आहे, कर्जमुक्तीच्या आशेवर शेतकरी बॅंकांचा थकबाकीदार झाला आहे. त्यामुळे त्याला कर्ज मिळत नाही. या हंगामात शेती करण्यासाठी त्यांचे पैसा नाही, त्यामुळे शेतकरी आज हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता सरकारने निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची कर्जमुक्तीची वेळ कधी येणार हा प्रश्‍नच आहे. मात्र अगोदर त्यांनी कर्जमुक्ती बाबत श्‍वेतपत्रिका काढावी, ती कशी करणार, किती लाखापर्यत करणार याची सविस्तर माहिती द्यावी. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची खऱ्या अर्थाने हमी मिळेल. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, राजीव देशमुख, संजय पवार, विकास पवार, अनिल भाईदास पाटील आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT