aashish shelar
aashish shelar 
विश्लेषण

म्हणे भाजपचे दहा आमदार फुटणार! : खवळलेले आशिष शेलार मग काय म्हणाले?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आपल्यासह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांंना आश्वासन देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आलेतरी साधे खातेवाटही करू शकले नाही. दिलेली आश्वासने पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमधे अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत,अशा शब्दांत राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री, आमदार  आशिष शेलार यांनी तिघाडीचा जोरदार समाचार घेतला आहे.

`भाजपातील डझनभर आमदार फुटणार`, असे  वृत्त आज सूत्रांच्या हवाल्याने काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही निव्वळ अफवा आहे, असा दावा त्यांनी केला.

तिघाडीच्या नेत्यांकडून अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. चोराच्या उलट्या बोंबा मारणे सुरु आहे. भाजपमध्ये अन्य पक्षातून आलेले असो वा मूळ भाजपचे असलेले आमदार सर्व पक्ष शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे, असे शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केले त्यामुळेच आश्वासक, प्रभावी, पारदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन अन्य पक्षातून अनेक आमदार भाजपमध्ये आले. सत्तास्थापनेच्या काळात भाजपला या सर्व आमदारांवर विश्वास असल्यानेच त्यांना तिघाडीच्या आमदारांप्रमाणे डांबून ठेवावे लागले नाही. कुणीही कुठल्याही प्रकारे पक्ष शिस्त मोडली नाही. तिन्ही पक्षांनी आमदारांना डांबून ठेवले. मोठमोठी आश्वासनं दिली. प्रत्यक्ष आता काहीच घडत नाही. त्यामुळे त्यांच्याच आमदारांंमधे अस्वस्थता आहे, असा दावा त्यांनी केला.

सध्या तिघाडीचे जे सुरु आहे ते पाहून भाजपमधे अन्य पक्षातून आलेले आमदार म्हणत आहेत की, बरे झाले आम्ही भाजपमधे आलो. आम्ही 105 आमदार संपूर्ण पणे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असून अनेक लोककल्याणकारी प्रकल्प बंद करून विनाशाचे काम करणाऱ्या या सरकारला लोकांच्या प्रश्नांवर आम्ही सळोकी पळो करुन सोडू. सत्तेची विनाशकारी तिघाडी केलेल्या या पक्षांनी जरा आपल्या पक्षातील आमदारांच्या मनात नेमके काय चाललेय ?त्याचा एकदा कानोसा घ्यावा,असा सल्ला ही आमदार अँड आशिष शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT