विश्लेषण

पवार साहेब, मोहितेंसारखा `अन्याय` माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरही करा : आव्हाड

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे वडील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्षाने भरभरून दिले असतानाही त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याने त्यावर राष्ट्रवादीच्या गोटातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक टीका करून लक्ष वेधून घेतले आहे.

मोहिते पाटील घराणे नेहमीच सत्तेत राहिले. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सत्तेच्या काळात विजयदादा हे 2009 ते 2014 या काळात मंत्री होते. काही कालावधीसाठी त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीही केले होते. त्यांचा 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. 2014 मध्ये ते माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.

मुलगा रणजितसिंह यांना राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार या पदांवर संधी दिली. तरी हा मोहिते पाटील घराण्यावर अन्याय असल्याची टीका कालच्या मोहिते समर्थकांच्या मेळाव्यात झाली.

असाच `अन्याय` माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. पवार साहेबांनी मोहिते पाटील घराण्याला काय काय दिले, यावर त्यांनी ट्विट करून यादी दिली आहे. रणजितसिंह यांना युवकचे  प्रदेशाध्यक्ष कसे केले, याची आठवण त्यांनी याद्वारे करून दिली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT